Indian Premier League 2021 | मुंबई इंडियन्स ‘लई भारी’ आज थेट RCB ला सलामीची टक्कर देणार !

374
Indian Premier League 2021

Indian Premier League 2021 : गतविजेत्या मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (IPL 2021: MIvs RCB T20 Live Score Update) इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL2021) 14 व्या सीझनची सुरुवात हाय व्होल्टेज सामन्यापासून होत आहे.

आयपीएलचे सामने मुंबई, बंगळुरू, चेन्नई, दिल्ली, कोलकाता आणि अहमदाबाद येथे होतील. यंदाच्या आयपीएलमध्ये कोणताही संघ होम ग्राउंड खेळू शकणार नाही. त्यामुळे तटस्थ ठिकाणी सामने खेळल्यामुळे चाहत्यांची उत्सुकता आणखीनच वाढली आहे.

मुंबई आणि बंगळुरू यांच्यात पहिला सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर (MA Chidambaram Stadium) खेळला जाईल. यासाठी मुंबई इंडियन्सची टीम रॉयल स्टाईलने स्टेडियमवर रवाना झाली आहे.

आयपीएल 2021 कठोर नियम | काय करू नये !

  • कुटुंबातील सदस्य कोणत्याही पूर्वानुमानित कल्पनांशिवाय बायो-बबलमध्ये प्रवेश करू शकणार नाहीत. म्हणून जर कुटुंबातील कोणताही सदस्य खेळाडू किंवा कर्मचार्‍यांना भेटायला आला तर ही कल्पना बीसीसीआय आणि मुख्य वैद्यकीय अधिकारी यांना द्यावी लागेल.
  • संपूर्ण स्पर्धेतील खेळाडूंप्रमाणेच, त्यांच्या कुटुंबातील सदस्य बायो बबलमधून बाहेर पडू शकणार नाहीत.
  • हॉटेलमध्ये इतर अतिथींना भेटण्यास मनाई.
  • हॉटेलमधील अतिथी आणि खेळाडूंना स्वतंत्र विंग दिली जाते. म्हणून पाहुण्यांना भेटणे सक्तीने निषिद्ध आहे.
  • माध्यम प्रवेश नाकारला गेला नाही. खेळाडूंनी माध्यम प्रतिनिधींनाही भेटू नये आणि आयपीएल 2021 मध्येही मीडियाला परवानगी नाही.
  • यावर्षीच्या आयपीएलमध्ये सॉफ्ट सिग्नल नियम असणार नाही. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतल्या सॉफ्ट सिग्नल निर्णयाबद्दल कर्णधार विराट कोहलीने नाराजी व्यक्त केली होती. म्हणून, हा नियम आयपीएल 2021 मध्ये होणार नाही.
  • चेंडू थुंकू नका.

आयपीएल 2021 कठोर नियम | काय करावे !

  • सात दिवसांचं सक्तीचं क्वारंटाईन – आयपीएल बायो-बबलमध्ये दाखल होताच सात दिवसांच्या क्वारंटाईन कालावधी खेळाडूंना पूर्ण करावा लागेल. हाच नियम खेळाडूंच्या कुटुंबीयांनाही लागू असेल.
  • बीसीसीआयच्या आदेशानुसार आयपीएलमधील प्रत्येक संघाचा डाव ९० मिनिटांच्या आत संपायला हवा. याआधी प्रत्येक डावाचं २० वं षटक ९० व्या मिनिटाला सुरु व्हायला हवं, असा नियम होता. पण आता नियमात बदल करण्यात आला आहे. नव्या नियमानुसार सामन्याचं २० वं षटक ९० व्या मिनिटाला संपायला हवं.
  • बबल बाहेरील खेळाडूशी संपर्क आल्यास मैदानावरील खेळाडूनं त्वरित जर्सी बदलावी.
  • चेंडू सीमारेषेबाहेर गेल्यास त्याला सॅनिटाईझ करावे.
  • या स्पर्धेत बबल-टू-बबल असे ट्रान्स्फर असणार आहे. (Bubble-to-Bubble Transfers). याचा अर्ध एखादा खेळाडू किंवा कोचिंग स्टाफचा सदस्य आंतरराष्ट्रीय मॅचमधूल आल्यास तो आयपीएल बायो-बबलमध्ये क्वारंटाईन कालावधी पूर्ण न करताच दाखल होऊ शकतो. पण, ते खेळाडू किंवा स्टाफ चार्टर्ड विमान किंवा प्रायव्हेट कारनं येत असेल तरच त्याला आयपीएल बायो-बबलमध्ये येता येईल.
  • Indian Premier League 2021 बातम्या आणि अपडेटसाठी Rajnetanews.com फॉलो करा !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here