कोरोना प्रतिबंधक लसीत भारताची ‘गरुडझेप’

138

नवी दिल्ली : कोरोनावर अत्यंत प्रभावी लस बनविण्याच्या स्पर्धेत भारताने मोठी आघाडी घेइटली आहे.

या बाबतीत चीनलाही मागे टाकल्याचे चीनमधील वृत्तपत्रे आणि तज्ज्ञांनी कबूल केले आहे.

अत्यंत प्रभावी लस बनविण्याच्या बाबतीतील भारताचे कौशल्य व यश पाहून लस निर्मितीच्या क्षेत्रात भारत हा शक्तिशाली देश असल्याचे आता संपूर्ण जगाने मान्य केले आहे.

जगभरात भारताने बनविलेल्या लसींची मागणी वाढत आहे. भारतीय लस गुणकारी असल्याचे जगाने मान्य केले आहे.

अनेक देशांनी चीनच्या सायनोव्हॅक कंपनीने तयार केलेल्या ‘कोरोनाव्हॅक’ लसीसाठी नोंदविलेली मागणी मागे घेण्यास सुरुवात केली आहे.

अनेक देशांनी भारतातील लसींची मागणी केली आहे. जगात वापरल्या जाणार्‍या निम्म्याहून अधिक लसी भारतात तयार केल्या जातात, ही वस्तुस्थिती आहे.

कोरोना लसीच्या बाबतीतही भारत जगातील एक प्रमुख शक्ती म्हणून उदयास आला आहे.

जागतिक स्तरावर या क्षेत्रात भारत एक महत्त्वाचा देश ठरला आहे. कोरोना लसीच्या निमित्ताने भारताने या क्षेत्रात मोठी झेप घेतल्याचे मानले जात आहे.

ब्राझील हा देश आतापर्यंत चीनने तयार केलेली कोरोना लस वापरत होता.

पण, आता भारताने आपल्याला ‘कोव्हिशिल्ड’ ही लस पुरवावी अशी ब्राझीलची इच्छा आहे.

जगातील अनेक देशांनी कोव्हिशिल्डची मागणी केली आहे. एक डझनपेक्षा अधिक देशांनी भारत बायोटेक निर्मित ‘कोव्हॅक्सिन’ खरेदी करण्यात रस दाखविला आहे.

विशेष म्हणजे जगातील सर्व देशांच्या प्रसारमाध्यमांनी लसींच्या क्षेत्रातील भारताचे वर्चस्व मान्य केले आहे.

लस तयार करण्याच्या बाबतीत भारत जगात पहिल्या स्थानावर असल्याचे प्रत्येक जण मान्य करीत आहे.

चीनमधील या क्षेत्रातील तज्ज्ञांनीही सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया दर्जेदार लस तयार करीत असल्याचे आणि त्यांची उत्पादन क्षमताही प्रचंड असल्याचे मान्य केले आहे.

भारतात दोन लसींना मंजुरी

भारतात आतापर्यंत कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लसींना मान्यता मिळाली आहे.

पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटने ऑक्सफर्ड आणि अस्ट्राजेनेकाच्या मदतीने कोव्हिशिल्ड ही लस तयार केली आहे.

सीरममध्ये सध्या रात्रंदिवस लस उत्पादन करण्यात येत आहे. देशांतर्गत मागणीसह जगभरातील अनेक देशांनी सीरमकडे या लसीची मागणी नोंदविली आहे.

दुसरीकडे कोव्हॅक्सिन ही संपूर्णपणे भारतीय बनावटीची लस भारत बायोटेक कंपनीने निर्माण केली आहे.

ही लस 90 टक्के सुरक्षित आणि प्रभावी असल्याचा दावा कंपनीने केला आहे. या लसीला ब्रिटन आणि अमेरिकेसह जगभरातूनही मागणी येत आहे.

भारत बायोटेककडे केवळ प्रचंड संशोधन सुविधा नाहीत, तर त्याची उत्पादन क्षमताही प्रचंड मोठी आहे.

यापूर्वीही भारत बायोटेकने अनेक रोगांवरील औषधे विकसित केली असून, जगभरात मोठ्या प्रमाणात त्यांचा वापर केला जात आहे.

चीनची लस मागे का पडली?

ब्राझीलसह अनेक विकसनशील देशांनी चीनच्या कोरोना लसीसाठी मागणी नोंदविली होती.

ही लस बनविणारी ‘सायनोव्हॅक’ ही सरकारी कंपनी असून ती बिंजीगमध्ये आहे.

ही लस केवळ स्वस्त दरातच विकण्यात येत नव्हती तर इतर लसी येण्यापूर्वीच ती तयार करण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता.

आता या लसीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. चीनने तयार केलेली लस जुन्या तंत्रज्ञानाच्या आधारे बनविली आहे. ही लस रसायनांनी बनविली जाते.

हे जुने तंत्रज्ञान विषाणूला कमकुवत किंवा नष्ट करण्याचे कार्य करते.

यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत होत नाही. रोगप्रतिकारक शक्ती घटते किंवा तिचा प्रतिसाद कमी होतो.

अमेरिका, युरोप आणि भारतात तयार केलेल्या लसी एमआरएनए तंत्रज्ञानाच्या साहाय्याने निर्माण करण्यात आल्या आहेत.

पण, गेल्या आठवड्यात जेव्हा ब्राझीलने चीनच्या या लसीची आपल्या देशातील प्रयोगशाळांमध्ये तपासणी केली.

ज्यांना ही लस देण्यात आली होती त्यांच्यावरील परिणाम जाणून घेतले, तेव्हा चीनची लस फारच कमी गुणकारी असल्याचे स्पष्ट झाले.

ब्राझीलचे शास्त्रज्ञ म्हणतात की, चिनी लस केवळ 50 टक्के प्रभावी आहे.

हा निष्कर्ष येताच ज्या देशांनी या लसीची मोठी मागणी नोंदविली होती, त्यांनी प्रश्न उपस्थित केले.

त्यापैकी बर्‍याच देशांनी भारताला लस पुरविण्याची विनंती केली आहे.

ग्लोबल टाइम्सचा निर्वाळा

कोरोना लसीबाबत प्रथमच चीनने भारताचे कौशल्य आणि उत्पादन क्षमतेतील वर्चस्व मान्य केले आहे.

ग्लोबल टाइम्सच्या अहवालानुसार चिनी तज्ज्ञ जिआंग चुनलाय यांनी म्हटले, भारतातील सीरम इन्स्टिट्यूट ही जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी आहे.

ती केवळ उत्कृष्ट पद्धतीने लस निर्माण करते असे नाही तर पुरवठा करण्याची तिची क्षमतादेखील मोठी आहे.

या क्षेत्रात पाश्चिमात्य देशांपेक्षा भारतातील ही कंपनी आघाडीवर आहे.

भारतीय लस उत्पादकांनी फार पूर्वीच जागतिक आरोग्य संघटनेसह अमेरिकेतील सर्वात मोठी संस्था जीएव्हीआय, पॅन अमेरिकन हेल्थ ऑर्गनायझेशन, दक्षिण अमेरिकेतील पीएएचओ आदी संस्थांशी करार केले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here