भारताची मदत रामायणातील संजीवनीप्रमाणेच | ब्राझिलच्या राष्ट्राध्यक्षांचं मोदींना पत्र

131

करोनावरील लस घेतली, तर माणसं मगर होतील आणि महिलांना दाढी येईल, असं विधान करणारे ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोलसोनारो यांनी आता लसीसाठी भारताकडे मदत मागितली आहे.

कोरोनाचं संकट संपूर्ण जगावर ओढावलं असताना भारताकडून वेगवेगळ्या देशांना मदत पोहोचवली जात आहे. अमेरिकेनंतर आता ब्राझीलने ही भारताने केलेल्या मदतीबद्दल आभार मानले आहेत. 

ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जेर बोलसोनारो यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र पाठवून भारताने केलेल्या मदतीची तुलना हनुमानाने आणलेल्या संजीवनी सोबत केली आहे. त्यांनी भारत आणि ब्राझील यांच्यातील मैत्रीचा देखील उल्लेख केला.

बोलसोनारो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लसीसाठी पत्र लिहिलं आहे. ब्राझीलला दोन कोटी डोस तात्काळ द्यावेत, अशी विनंती बोलसोनारो यांनी केली आहे.

करोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांच्या क्रमवारीत ब्राझील दुसऱ्या क्रमांकावर आहे. ब्राझीलमध्ये करोनामुळे दोन लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड या लसींना परवानगी दिल्यानंतर ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोलसोनारो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे.

भारताने करोनावरील दोन लसींना आपत्कालीन वापराला परवानगी दिल्यानंतर ही मागणी करण्यात आली आहे. भारतात करोनाच्या दोन लसींना आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे.

एस्ट्रॉझेनेकाच्या लसीचा तात्काळ पुरवठा करावा, असं आवाहन बोलसोनारो यांनी केलं आहे. ऑक्सफर्ड आणि एस्ट्रॉझेनेकाच्या लसीला परवानगी मिळालेली असून, पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये ही लस तयार केली जात आहे.

भारतात ही लस कोविशिल्ड नावाने बाजारात आणली गेली आहे. बोलसोनारो यांचं पत्र त्यांच्या माध्यम कार्यालयाने प्रसिद्ध केलं आहे.

“ब्राझीलमध्ये राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रम तातडीने सुरू करण्यासाठी भारतातील लसीकरण मोहिमेवर कोणताही परिणाम होणार नाही, याची काळजी घेत कोविड लसीचे २० लाख डोस तातडीने पाठवावे,” असं बोलसोनारो यांनी पत्रात म्हटलं आहे.

ब्राझीलचे राष्ट्राध्यक्षांनी म्हटलं की, ‘त्यांच्या देशात २ लॅब कोरोनावर वॅक्सीन बनवत आहे. पण याची निर्यात पूर्णपणे भारतावर अवलंबुन आहे. त्यामुळे भारताकडून मदतीची अपेक्षा आहे.’

याआधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य देखील आलं होतं. ज्यामध्ये त्यांनी भारताने केलेल्या मदतीसाठी पंतप्रधान मोदींचं कौतुक केलं होतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here