अन्न प्रक्रिया उद्योगासाठी लातूर जिल्ह्यातील वैयक्तीक लाभार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी करावी

479
Individual beneficiaries in Latur district should register online for the food processing industry

लातूर : जिल्हयातील वैयक्तीक लाभार्थ्यांनी अन्न प्रक्रिया उद्योगासाठी ऑनलाईन पध्दतीने जास्तीत जास्त नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी केले आहे.

केंद्र पुरस्कृत आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत PMFME प्रधानमंत्री सुक्ष्म खाद्य उद्योग उन्‍नयन ही योजना असंघटीत क्षेत्रातील अन्न प्रक्रिया उद्योगासाठी राबविली जाणार आहे.

या योजने अंतर्गत केंद्र शासनाने लातूर जिल्हयासाठी एक जिल्हा एक उत्पादन (ODOP) या बाबीखाली टोमॅटो या पिकास मंजूरी दिलेली आहे.

ही योजना सन 2020-21 ते 2024-25 या पाच वर्षात राबविली जाणार आहे.

सदर योजना सन 2021-22 अंतर्गत लातूर जिल्हयातील वैयक्तीक सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योजकांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

या योजने अंतर्गत वैयक्तीक सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना एकूण प्रकल्प किमतीच्या 35 टक्के व कमाल रु. 10 लाख या मर्यादेत अनुदान देय राहील.

लाभार्थी हिस्सा हा प्रकल्प किमतीच्या किमान 10 टक्के असेल व उर्वरीत बँकेचे कर्ज असणे बंधनकारक आहे.

वैयक्तीक सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योजकांना योजने अंतर्गत सहभागी होण्याकरीता ऑनलाईन पोर्टल सुरु झाले आहे.

● या करीता अर्जदारांची नोंदणी व अर्ज भरण्याकरीता https://pmfme.mofpi.gov.in/ या वेबसाईटचा वापर करावा.

● अधिक माहितीसाठी जिल्हा अधिक्षक कृ‍षि अधिकारी, लातूर कार्यालयातील तंत्र सहाय्यक एम.एम. निटूरे मो.नं.9422750401 यांच्याशी सपंर्क करावा.

● तसेच www.krishi.maharashtra.gov.in या संकेत स्थळाला भेट दयावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here