जळकोट : शहरात गेल्या तीन ते चार महिन्यापासून पाणीपुरवठा बंद आहे. (NH50) राष्ट्रीय महामार्गाचे काम पुर्ण झाले आहे तरीही जळकोट शहरातील पाणीपुरवठा सुरळीत झालेला नाही.
पाईपलाईनचे टेंडर 23,50,000 चे बनवुन संबंधित ठेकेदाराने शासनाची दिशाभुल करून अतिशय निकृष्ट दर्जाचे काम केलेले आहे. अवघ्या दोनच दिवसात पाईपलाईन गळतीची समस्या निर्माण झाल्यामुळे जळकोटच्या जनतेला भर उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.
संबंधित ठेकेदाराशी संपर्क साधला असता त्याच्याकडून उडवाउडवीची व अरेरावीची उत्तर मिळत आहेत. त्यामुळे लातुर जिल्हाचे जिल्हाधिकारी, जळकोटचे तहसीलदार व नगरपंचायतचे मुख्याधिकारी यांनी या कामाची चौकशी करून संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा व पुढची 5 वर्षे पाईपलाईन दुरुस्तीची हमी त्या ठेकेदारा कडुन घ्यावी.
प्रशासनाने जर वेळेत कारवाई केली नाहीतर तहसील समोर जळकोटकरांच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा येथील सामाजिक कार्यकर्ते विवेकानंद उर्फ बाळू देवशेट्टे यांनी प्रशासनाला निवेदनाद्वारे दिला.
या निवेदनावर माधव होनराव, बालाजी मुगावे, पप्पू फुलारी, उमाकांत चिकले, माधव गुद्दा, संगम चिकले, राजू तीलमलदार, सिद्धार्थ वाघमारे, गोविंदा डांगे, अविनाश गायकवाड, आकाश कदम, कल्पेश होट्टे, गोविंद मंगनाळे, परमेश्वर मठदेवरू, अमर शेख, काशिनाथ गुड्डा, पप्पू कळसे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.