कार्यकर्त्याला अमानुष मारहाण, पोलिस उपनिरीक्षकासह 4 पोलीस कर्मचारी निलंबित

1068

जालना : भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस शिवराज नारियलवाले यांना अमानुषपणे मारहाण केल्या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षकासह 4 पोलीस कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे.

27 मे रोजी शिवराज नारियालवाले यांना अमानुषपणे मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर या सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी स्वतः चौकशी केली होती.

पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी शुक्रवारी याबाबत आदेश काढले आहेत. आता पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्यावर काय कारवाई होते? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

7 एप्रिल रोजी जालना शहरातील दीपक हॉस्पिटल येथे तोडफोड केल्याप्रकरणी बळाचा वापर केल्याचा दावा करणारे पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन हे देखील आता अडचणीत सापडण्याची चिन्हे आहेत.

तिथे त्यांच्यासोबत मारहाण करणारे पोलिस उपनिरीक्षक भागवत कदम, पोलिस कर्मचारी सोमनाथ लहामगे, नंदकिशोर ढाकणे, सुमित सोळंके, महेंद्र भारसाकळे यांच्या निलंबनाचे आदेश पोलिस अधीक्षक विनायक देशमुख यांनी शुक्रवारी काढले आहेत.

या प्रकरणाची अतिरिक्त पोलिस अधीक्षक विक्रांत देशमुख यांच्यामार्फत त्यांची चौकशी सुरू होती. अखेर शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास त्यांच्या निलंबनाचे आदेश काढण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here