लातुरातील कारागृहात कैद्याची आत्महत्या, शाैचालयातच घेतली गळफास

366
Sucide

लातूर : येथील जिल्हा कारागृहात एका कैद्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी पाेलीस ठाण्यात त्याच्याविराेधात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला हाेता.

दरम्यान, या गुन्ह्यात लातूरच्या जिल्हा कारागृहात बंदिस्त असलेल्या बजरंग शेषेराव पवार (२०, रा. जामगा ता. निलंगा) याने कारागृहातील शाैचालयातच गळफास घेवून आत्महत्या केली.

याबाबत एमआयडीसी पाेलीस ठाण्यात घटनेची नाेंद करण्यात आली आहे.

सूत्रांनी सांगितले, मयत बजरंग पवार आणि त्याचा चुलत भाऊ हे कलम ३७६ व पाेस्काेअंतर्गत लातूर जिल्हा कारागृहात १५ जूनपासून बंदिस्त हाेते.

दरम्यान, या गुन्ह्यातून आपण लवकर काही बाहेर पडू शकरणार नाही, असे बजरंगला सतत वाटत होते. यातूनच त्याच्यामध्ये नैराश्याची भावना निर्माण झाली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

शनिवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ताे शाैचालयात म्हणून गेला आणि तेथेच गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत एमआयडीसी पाेलीस ठाण्यात नाेंद करण्यात आली आहे.

टाॅवेल फाडून तयार केला दाेर

बजरंग पवार हा गत आठ दिवसांपासून आपल्या भावाशी फारसे काही बाेलत नव्हता. मात्र, आपल्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यातून लवकर बाहेर पडणे आता शक्य नाही, असे त्यास सतत वाटत हाेते.

यातूनच बजरंग याने आपल्या कमरेला असलेले टावेल शाैचालयात गेल्यानंतर फाडले आणि त्यापासून दाेर तयार केला.

त्यानंतर गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. असे लातूर येथील कारागृह अधीक्षक राहुल झुटाळे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here