कोरोना काळात ई-पासच्या सहाय्यानेच आंतरजिल्हा प्रवास करता येईल, ही आहे पूर्ण प्रक्रिया!

787
E pass

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात राज्य शासनाने पुन्हा एकदा काही कठोर पावले उचण्यास सुरुवात केली. सरकारनं ‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत असणारे निर्बंध आणखी कठोर केले आहेत.

कारण महाराष्ट्रात कोरोनाच्या संसर्गाची दुसरी लाट थैमान घालत आहे. कोणत्याही अत्यावश्यक कारणाशिवाय आंतरजिल्हा प्रवासाला मनाई करण्यात आली आहे.

जर तुम्हाला काही अत्यावश्यक कारणांसाठी आंतरजिल्हा प्रवास करायचा झाला तर त्यासाठी ई-पास काढणं बंधनकारक आहे.

यासोबतच प्रवासावरील निर्बंधही अधिक कडक करण्यात आले आहेत. त्यामुळे आता जिल्हांतर्गत प्रवासासाठी सर्वसामान्यांना ई पास आवश्यक असेल.

रितसर अर्ज करून ई-पास मिळवता येईल. काही महत्त्वाच्या कारणासाठी प्रवास करण्याची गरज निर्माण झाल्यासच नागरिकांनी ई- पासचा वापर करावा असं आवाहन राज्यातील पोलीस विभागाकडून करण्यात आलं आहे.

कोरोना काळात ई-पासच्या साहाय्यानेच तुम्ही आंतरजिल्हा प्रवास करू शकता. पण, हा ईपास काढायचा कसा? याबाबत अनेकांना काही प्रश्न आहेत. हा ई-पास कसा काढायचा याची माहिती पुढीलप्रमाणे आहे.

कसा मिळवायचा ई- पास?

  • ई- पास मिळवण्यासाठी https://covid19.mhpolice.in या संकेतस्थळाला भेट द्या.
  • त्यानंतर ‘apply for pass here’ पर्याय निवडा.
  • पुढे तुम्हाला ज्या जिल्ह्यात प्रवास करायचा आहे, तो जिल्हा निवडा.
  • आवश्यक कागदपत्र इथं जोडा.
  • प्रवास करण्यासाठीचं अत्यावश्यक कारणही नमूद करावं.
  • कागदपत्र अपलोड करताना सर्व माहिती तपशील एकाच डॉक्युमेंटमध्ये घेऊन ती फाईल अपलोड करावी.
  • अर्ज केल्यानंतर तुम्हाला एक टोकन आयडी देण्यात येईल. तो सेव्ह करुन अर्ज नेमका कोणत्या प्रक्रियेत आहे हे तुम्ही जाणू शकता. म्हणजेच तुम्हाला अर्जाचं स्टेटस तपासता येईल.
  • पडताळणी आणि आवश्यक विभागांची परवानगी मिळाल्यानंतर तोच टोकन आयडी वापरुन तुम्ही ई- पास डाऊनलोड करु शकता.
  • या ई-पासमध्ये तुमची माहिती, वाहनाचा क्रमांक, पासचा वैधता कालावधी आणि क्यूआर कोड असेल.
  • प्रवास करतेवेळी पासची मूळ प्रत आणि त्याची सॉफ्ट कॉपीही सोबत बाळगा. जेणेकरुन पोलिसांनी विचारलं असता, त्यांना हा पास दाखवता येऊ शकतो.

ई- पासबद्दलचे काही महत्त्वाचे मुद्दे-

  • अतिशय जवळच्या व्यक्तीचा विवाहसोहळा, एखाद्या व्यक्तीचा अंत्यविधी आणि अत्यावश्यक आरोग्य आणीबाणी या कारणांसाठी ई-पास मिळवता येऊ शकतो.
  • अत्यावश्यक सेवांतील कर्मचाऱ्यांना आंतरराज्यीय आणि जिल्हांतर्गत प्रवासासाठी ई- पासची गरज नाही.
  • कोणतीही व्यक्ती किंवा त्यांचा समूह या पाससाठी अर्ज करु शकतो.
  • ज्यांना ऑनलाईन सेवेसाठीचा अॅक्सेस मिळत नाही, अशा व्यक्तींनी ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी नजीकच्या पोलीस स्थानकाला भेट द्यावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here