तेलंगणा मध्ये मशिदीच्या भिंतीवर ‘जय श्री राम’ लिहिणारे गुन्हेगार मुस्लिम असल्याचे तपासात निष्पन्न

319
पोलिस अधिकारी किरण खरे

हैदराबाद : तेलंगणा राज्यातील भैंसा येथे काही दिवसांपूर्वी एका मशिदीच्या भिंतीवर ‘जय श्रीराम’ असे लिहिल्यामुळे गदारोळ उडाला होता.

मात्र हा प्रकार दोन मुस्लिम मुलांनीच केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून उघड झाले आहे. त्यामुळे या प्रकरणाला नवेच वळण लागले आहे.

याबाबत भैंसाचे पोलिस अधिकारी किरण खरे यांनी सांगितले की, मशिदीच्या भिंतीवर ‘जय श्रीराम’ लिहिणाऱ्यांचा सुगावा लागला आहे

हा प्रकार कोणी हिंदू व्यक्तीने नव्हे तर मोहम्मद अब्दुल कैफ आणि एका अल्पवयीन मुलाने केला आहे. त्यांनी हे का केले? कोणाच्या सांगण्यावरून केले? असे करण्याचा उद्देश काय? याचा तपास पोलीस करीत आहेत.

तेलंगणमधील भैंसा गाव गेल्या काही दिवसांपासून धार्मिक वादांमुळे आणि मुस्लिम समाजाकडून हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून चर्चेत आले होते.

खरे यांनी सांगितले की, मशिदीच्या भिंतीवर ‘जय श्रीराम’ हा मजकूर लिहिल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल झाली होती. त्यानुसार पोलिसांनी तपास केला होता.

तेव्हा सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा मजकूर मोहम्मद अब्दुल कैफ आणि एका अल्पवयीन मुलाने लिहिल्याचे उघड झाले आहे. त्यांना अटक केली आहे.

मोहम्मद अब्दुल कैफ हा 20 वर्षांचा असून त्याचा दुसरा साथीदार हा 14 वर्षांचा अल्पवयीन मुलगा आहे. दोघेही मशिदी जवळच राहतात.

कैफने सांगितल्याप्रमाणे त्याच्यासोबत असलेल्या अल्पवयीन मुलाने मशिदीच्या भीतीवर ‘जय श्रीराम’ हा मजकूर लिहित असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये उघड झाले आहे.

आरोपींनी मजकूर लिहिल्याचे कबूल केल्यामुळे त्यांना अटक केल्याचे पोलिसानी सांगितले. त्यामुळे या प्रकरणात कोण कोण गुंतलेले आहे याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here