बॉलिवूड सुपरस्टार आमीर खानची मुलगी इरा खान सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. आपले सुंदर फोटो ती नेहमी शेअर करत असते. सध्या तिनं टाकलेल्या फोटोंवरुन तिची खूप चर्चा सुरु आहे.
नुकतंच तिनं इन्स्टाग्राम बिकिनीमधील आपले सुंदर फोटो शेअर केले आहेत. ज्यावर तिच्या फॅन्सनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केलाय. इरा खाननं काळ्या आणि पिवळ्या रंगाची बिकीनी घातली आहे.
या फोटोंना तिनं एक सुंदर कॅप्शन देखील दिलं आहे. ‘मला आयुष्यात खूप काही करायचं आहे. कधी कधी आपल्या आपल्यासाठी एका ब्रेकचीही गरज असते. सर्वात आधी आपल्याला आपल्या ध्येयाकडे वाटचाल करणं गरजेचं आहे. आता मी पुन्हा कामासाठी जात आहे’
इरा खानचे इन्स्टाग्रामवर तीन लाखांहून अधिक फॉलोवर आहेत. इरा खान आणि जुनैद आमीर खानची पहिली पत्नी रीना दत्ता यांची मुलं आहेत.