निलंगा तालुक्यातील शेडोळ येथे चॉकलेटच्या आमिषाने घराच्या मागील बाजूस खेळत असलेल्या वर्षाच्या मुलीवर एका 25 वर्षीय व्यक्तीने सात लैंगिक अत्याचार केले. याप्रकरणी निलंगा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 6 एप्रिल रोजी दुपारी तीनच्या सुमारास अकरम जिबराल मुल्ला याने चॉकलेटच्या आमिषाने आपल्या घराजवळ खेळत असलेल्या सात वर्षाच्या मुलीस जवळ बोलावून घेतले.
त्यानंतर तिला जवळच्या दर्ग्यामागे नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. अल्पवयीन मुलीने आरडाओरडा केला असता आरोपीने तिला धमकावले आणि तिला तिथेच सोडून पळ काढला.
पीडितेने तिच्या आईवडिलांना तिच्यासोबत घडलेल्या प्रकारानंतर त्यांनी पोलिस स्टेशन गाठले आणि फिर्याद दिली. पोलिसांनी आरोपीविरोधात 376 ए, बी, 377, 504, 506 भादवी सह कलम 4(2), 7, 8, 12 बाल लैंगिक अप्रका. 2012 कलम 3 (आय) अंतर्गत गुन्हा नोंद दाखल केला आहे. उपविभागीय अधिकारी दिनेशकुमार कोल्हे पुढील तपास करीत आहेत.