मुलांना ‘फ्लू’ची लस देणे महत्त्वाचे आहे का? जाणून घ्या, डॉक्टर काय सल्ला देतायत !

316

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून अजून सावरले जात नाही, तोच तिसऱ्या लाटेचा फटका बालकांना बसण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे.

याबाबत बालरोगतज्ज्ञ डॉ.ओ.पी.स्वामी यांनी सांगितले की, “कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये 60 वर्षावरील वृद्ध लोकांना मोठ्या प्रमाणावर लागण झाली.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये तरुण वयोगटात कोरोना संक्रमण मोठ्या प्रमाणावर झाल्याचे दिसून येत आहे. कोरोना संक्रमणाची आकडेवारी नियंत्रणात आल्याचे दिसत असले तरी सर्वांनी काळजी घेण्याची गरज आहे.

प्रौढ वयोगटातील बहुतांश लोकांना एक तर कोरोना होऊन गेला आहे किंवा त्यांनी कोरोनाच्या एक किंवा दोन्ही लसी घेतल्या आहेत. त्यामुळे आता बालकांना कोरोनाची लागण होऊ नये म्हणून विशेष जागरूक राहिले पाहिजे.

कोरोनाची देशात तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना त्याचा फटका हा बालकांना मोठ्या प्रमाणावर बसण्याची शक्यता आहे.

या तिसऱ्या लाटेदरम्यान बालकांमध्ये तीव्र प्रकारचा ताप किंवा लक्षणे दिसू नयेत याकडे आता पालकांनी व वैद्यकीय तज्ज्ञांनी याकडे बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे.”

त्यामुळे पाच वर्षाच्या आतील मुलांना फ्लूची लस द्यावी, अशी शिफारस देखील इंडियन अ‍ॅकेडमी ऑफ पेडियाट्रिक्सने या आधीच केली आहे. या सुचनेकडे लक्ष देऊन पालकांनी ‘फ्लू’ ची लस द्यावी, असे आवाहन डॉ.स्वामी यांनी केले आहे.

फ्लूची लस बालकांमध्ये कोरोनाची तीव्रता कशी कमी करते?

कोविड -19 आणि इन्फ्लुएंझा या दोन्हीमध्ये काही समान लक्षणे दिसून येतात. जर कोरोनाच्या या लाटेमध्ये इन्फ्लुएंझाची साथ आल्यास या महामारीची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे.

त्यामुळे जर बालकांना फ्लूची लस आधीच दिली तर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा फटका हा दुसऱ्या लाटेप्रमाणे बसणार नाही, या लसीमुळे बालकांच्या रोगप्रतिकारक शक्तीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here