मुंबई : राज्याच्या मंत्रिमंडळातील उपमुख्यमंत्री बदलणार असून त्याजागी काँग्रेस पक्षाचा उपमुख्यमंत्री होणार असल्याचं बोललं जात आहे.
याच पार्श्वभूमीवर भाजप नेते निलेश राणे यांनी अजित पवारांवर निशाणा साधलाय.
अजित पवारांना कधी मुख्यमंत्री होता आले नाही व ते कधी होणार नाहीत पण कसंतरी उपमुख्यमंत्रीपद मिळालं होते.
आता 2 उपमुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळणार अशी चर्चा आहे म्हणजे अजित पवार यांची परत नॉटरिचेबल होण्याची वेळ आली, असं वक्तव्य निलेश राणेंनी केलं आहे.
दरम्यान, काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद मिळालच पाहिजे, तो त्यांचा अधिकार आहे, असं मतही निलेश राणेंनी यावेळी व्यक्त केलं आहे.
Nilesh N Rane
@meNeeleshNRane
अजित पवारांना कधी मुख्यमंत्री होता आले नाही व ते कधी होणार नाहीत पण कसंतरी उपमुख्यमंत्रीपद मिळालं होतं पण आता २ उपमुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळणार अशी चर्चा आहे म्हणजे अजित पवार यांची परत नॉटरिचेबल होण्याची वेळ आली. काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद मिळालच पाहिजे, तो त्यांचा अधिकार आहे.