जालना जिल्हा हादरला : एकाच दिवसात ४ कोरोनाबाधितांचा मृत्यू

194
Jalna district shaken: 4 corona victims die in a single day

जालना : कोरोना बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे राज्यात टेंशन वाढले असतानाच जालना कोरोनाने हादरला आहे. 

आज जिल्ह्यात कोरोनाने एकाच दिवसात चार बळी घेतल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. 

आज रविवारी जिल्ह्यात कोरोनामुळे चार जणांचा मृत्यू झाला असून नविन ९५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. गेल्या पाच-सहा दिवसांपासून बाधितांची संख्या वेगाने वाढत असल्याने प्रशासनासमोर आव्हान निर्माण झाले आहे.

गेल्या दोन दिवसांत ७ बाधित रूग्ण मरण पावले आहेत. आतापर्यंत कोरोनाने मरण पावलेल्यांचा आकडा ३८४ झाला आहे. तर बाधितांची संख्या १४ हजार ५२७ झाल्याचे प्रशासनाने सांगितले.

फेब्रुवारी महिन्याच्या २१दिवसांत कोरोनाचे ७७३ रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने जालना कोरोनाचा हॉटस्पॉट बनण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here