Janhvi Kapoor Item Song | जान्हवी कपूरच्या पहिल्याच आयटम साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ

260
Janhvi Kapoor Item Song

मुंबईः श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर एक चांगली डान्सर म्हणून ओळखली जाते. तथापि, जान्हवी पहिल्यांदा ‘रुही’ चित्रपटात आयटम साँग करताना दिसत आहे. 

रुही चित्रपटातील नदियों पार या आयटम साँगवर जान्हवीने जबरदस्त डान्स केला आहे. जान्हवीचे हे गाणे रिलीज होताच ट्रेंडिंग होत आहे. 

जान्हवीचे हे गाणे बघितल्यानंतर चाहते घायाळ झाले आहेत आणि तिचे काैतुकही करत आहेत. हे गाणे सचिन-जिगर यांनी रीकंपोज केले आहे. हे मूळ गाणे रश्मित कौर आणि शामूर यांनी गायले होते.

जान्हवीचे हे गाणे बघितल्यानंतर आता चित्रपट बघण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. सलमान खान आणि अभिनेत्री जान्हवी कपूर यांचा ‘गुड लक जेरी’ या आगामी चित्रपटाचे शूटिंग पंजाब येथे सुरू होती. मात्र, याची माहिती शेतकरी आंदोलकांना लागली आणि शेतकऱ्यांनी आपला मोर्चा चित्रपटाच्या सेटकडे वळवला होता. 

 

त्यांचे म्हणणे होते की, जोपर्यंत देशात लावण्यात आलेले नवे कृषी कायदे रद्द होत नाहीत तोपर्यंत कुठल्याही चित्रपटाचे शूटिंग पंजाबमध्ये होऊ देणार नाहीत. या चित्रपटाच्या सेटवर जान्हवी कपूर त्यावेळी शूटिंग करत होती. तिला शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे होते.

श्रीदेवी यांचा पुण्यतिथी निमित्ताने जान्हवी कपूर भावुक झाली होती. तिने सोशल मीडियावर भावूक कॅप्शन देत फोटो शेअर करत पोस्ट लिहिली होती.

जान्हवीने आपल्या ईन्स्टाग्राम अकाऊंटवर ब्लॅक अँड व्हाईटमध्ये फोटो शेअर केला होता. तो फोटो पाहून तुम्ही अंदाज लावू शकता की, या फोटोमध्ये जान्हवी आणि श्रीदेवी दिसत होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here