जान्हवीनने त्याला दियासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले. त्यामुळे श्री व जान्हवी यांच्यात वाद झाले होते.
मुंबई : मुंबईत वर्षाच्या पहिल्याच दिवशी एका १९ वर्षीय मुलीची हत्या झाली आहे.
नववर्षाचं स्वागत करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पार्टीतच मित्र आणि मैत्रिणीने मिळून एका 19 वर्षीय मुलीचा खून केल्याची घटना घडली आहे.
मुंबईतील खार परिसरात असणाऱ्या भगवती या इमारतीत ही हत्या झाली. हत्या झालेल्या तरुणीचे नाव जान्हवी कुकरेजा असे आहे.
या तरुणीची हत्या केल्याप्रकरणी श्री जोगधनकर आणि दिया पडळकर यांना अटक केली आहे. त्यांची ७ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
मात्र, पार्टीत सहभागी झालेल्यांच्या जबाबातून वेगवेगळी माहिती पुढे येत असल्याने नेमके त्या पार्टीत काय घडले, याचा शोध पोलिस घेत आहेत. ही हत्या प्रेमाच्या त्रिकोणातून झाली आहे का ? याबाबतही तपास केला जात आहे.
पार्टी सुरू असताना झालेल्या वादातून ही हत्या करण्यात आली आहे. हत्या करणाऱ्या आरोपींमध्ये मृत तरुणीच्या बॉयफ्रेण्डचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.
३१ डिसेंबरची पार्टी सुरु असताना जान्हवी कुकरेजा हिला दोन जणांनी मारहाण सुरू केली. ती गंभीर जखमी झाली. पायऱ्यांवर तिचं रक्तही सांडलं होतं,’ अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना दिली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, खार येथील जान्हवीची हत्या झाली त्या दिवशी संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंत श्री व दिया हे तिच्या घरी वडिलांचा वाढदिवस साजरा करत होते. ते दोघेही तिचे जवळचे मित्र आहेत.
भगवती हाईट्स इमारतीच्या टेरेसवर ३१ डिसेंबरच्या रात्री सुरू असलेल्या पार्टीत जवळपास १२ जण उपस्थित होते. श्री हा अन्य मुलींच्या जवळ जात होता हे जान्हवीला आवडत नव्हते.
या प्रकरणाचा तपास जलदगतीने व्हावा : आशिष शेलार
या प्रकरणी आशिष शेलार यांनी ट्विट केलं आहे. “खारमध्ये नववर्ष स्वागत पार्टीमध्ये तरुणीची हत्या झाल्याची घटना खूपच वेदनादायी आहे.मृत तरुणीच्या कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे.
मी या प्रकरणी पोलिस उपायुक्तांशी चर्चा केली आहे. या प्रकरणाचा तपास जलदगतीने व्हावा आणि गुन्हेगारांना तात्काळ अटक केली जावी अशी मागणी मी केली आहे”, असं शेलार यांनी ट्विटच्या माध्यमातून सांगितलं.