मुंबईकडे अखिल भारतीय किसान सभेच्या मोर्चाने कूच केली असून ट्रॅक्टर, जीप आदी वाहनांसह हजारो शेतकरी या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत.
हा मोर्चा 26 जानेवारीला राजभवनावर मोर्चा धडकणार आहे.
दोन महिन्यांपासून दिल्लीच्या वेशींवर केंद्र सरकारने लागू केलेल्या नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे.
महाराष्ट्रात या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अखिल भारतीय किसान सभेच्यावतीने मोर्चा काढला आहे.
आज दुपारी मुंबईतील आझाद मैदानात नाशिकच्या ईदगाह मैदानापासून निघालेला किसान सभेचा मोर्चा येऊन पोहचणार आहे.
या मोर्चात हजारो शेतकरी सहभागी झाले असून हे वादळ नाशिक कसारा घाटामार्गे शहापूर तालुक्यातून मुंबईत दाखल होणार आहे.
राज्यभरातील विविध जिल्ह्यातून हजारो शेतकरी या मोर्चासाठी सहभागी होत असल्याची माहिती किसान सभेच्यावतीने दिली आहे.
मुंबईतील आझाद मैदानातदेखील या संपूर्ण पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.
मुंबईत आज आझाद मैदानात मोर्चा दाखल झाल्यानंतर उद्या सकाळी 11 वाजता मुंबईतील आझाद मैदानात भाजप सोडून इतर सर्व पक्षातील नेते एकत्र येणार असल्याची शक्यता आहे.