मुख्यमंत्र्यावर नाराज जितेंद्र आव्हाड देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, राजकीय चर्चेला उधाण

147
मुख्यमंत्र्यावर नाराज जितेंद्र आव्हाड देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, राजकीय चर्चेला उधाण

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्करोग असणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना दिलेली घरे अन्यत्र स्थलांतरित केल्याने गृहमंत्री जितेंद्र आव्हाड कमालीचे नाराज झाले आहेत.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जितेंद्र आव्हाड यांनी अतिशय गुप्त पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. त्यांच्या भेटीचे नेमके कारण काय होते? हे गुलदस्त्यात आहे.

सद्यस्थितीत महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या स्वबळ आणि छुप्या बैठकांचे सत्र सुरु आहे. त्यामुळे आव्हाड फडणवीस यांची बैठकही गाजण्याची शक्यता आहे. देवेंद्र फडणवीस यांची घेतलेल्या भेटीविषयी उद्धव ठाकरे यांना कल्पना नसल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

शिवडीचे आमदार अजय चौधरी यांना देण्यात आलेल्या महत्त्वामुळे जितेंद्र आव्हाड नाराज असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. आव्हाड यांची नाराजी ओळखून मुख्यमंत्र्यांनीही तत्काळ पर्यायी जागा देण्याची ऑफर दिली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयावरून काहीही चुकीचे नसल्याचे दिसून येत असले तरी नाराजीमुळेचं आव्हाड यांनी फडणवीस यांची भेट घेतली.

देवेंद्र फडणवीस आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात सुमारे अडीच तास चर्चा झाली. ज्या दिवशी आव्हाड फडणवीस यांची भेट झाली त्याच दिवशी हा निर्णय फिरवला जाईल याची कल्पना होती. या दोघांमधील भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here