नव्या पिढीला शरद पवारांचे राजकारण कळणार नाही या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड यांचे ‘घुमजाव’

441
Jitendra Aawahad

मुंबई : नव्या पिढीला शरद पवार (Sharad Pawar) यांचे राजकारण कळणार नाही, असे विधान करणाऱ्या जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या भूमिकेत बदल झाला असून ती ‘खोटी अफवा’ असल्याचे सांगत घुमजाव केले आहे.

पवार साहेब-अमित शहा भेट झाली नाही. ही काळ्या दगडावराची पांढरी रेघ आहे. पवार-शाह भेटीच्या बातम्या निव्वळ अफवा आहेत. त्या फक्त राजकीय वातावरण गढूळ करण्यासाठी पसरवल्या जात आहेत.

प्रसारमाध्यमांकडून हा विषय विनाकारण चघळला जात आहे, या विषयावर मांडले जाणारे अंदाज फक्त माध्यमांची व भाजपाची खेळी आहे अशा आशयाचे ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.

भाजपचे नेते व गृहमंत्री अमित शाह (Home Minister Amit Shaha) यांनी पवारांच्या भेटीविषयी सूचक वक्तव्य करून संभ्रम आणखीन वाढवला होता. हा संभ्रम दूर होण्यासाठी खुद्द शरद पवार काय बोलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

मात्र, शरद पवार यांची प्रकृती सोमवारी अचानक बिघडली. पोटात दुखू लागल्याने शरद पवार यांना मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

याठिकाणी तपासणी झाल्यानंतर 31 मार्चला शरद पवार यांच्यावर एण्डोस्कोपीची (Endoscopy) शस्त्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती समोर आली. परिणामी शरद पवार आणखी काही दिवस प्रसारमाध्यमांसमोर येऊ शकणार नाहीत, हे स्पष्ट झाले आहे.

मात्र, त्यामुळे अमित शाह आणि त्यांच्या भेटीबाबतच्या गोष्टींवरून आणखी तर्कवितर्क लढवले जाण्याची शक्यता आहे.

पवार साहेब-अमित शहा भेट झाली नाही. ही काळ्या दगडावराची पांढरी रेघ आहे. तरी देखिल आमचे काही पत्रकार मंडळी रंग उधळत आहेत.

चघळायला काही नसले कि अफवेभवती दोन दिवस घालवता येतात. हेच या बातमीच्या रूपाने सिद्ध होतं.
माझ्या सर्व पत्रकार बांधवांना होळीच्या शुभेच्छा! बुरा ना मानो होली है.

— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) March 29, 2021

शरद पवार आणि अमित शहा यांची गुप्त भेट झाली तर तुमचे कोण गुप्तहेर होते हे माहीत नाही. पण 50 वर्षांच्या राजकीय जीवनात कुठल्याही पक्षाच्या नेत्यांनी जेवढे मित्र कमावले नाहीत तेवढे मित्र पवार साहेबांनी कमावले आहेत.

मग त्यातील कश्मीरचे फारूक अब्दुल्ला असतील, ओदिशातील विजू पटनाईक असो बंगाल मधले जोत्या बसू असो. ज्या ज्या राज्याचे प्रमुख नेते आहेत ते कायम शरद पवार यांचे मित्र राहिलेत.

आपल्या राज्यातील भाजप नेते प्रमोद महाजन हे यांच्याशीही शरद पवार यांचे जवळचे संबंध होते. संबंध आणि राजकारण याचा विचित्र प्रकार आता नवीन पिढीच्या राजकारणात आलाय. राजकारणात कोण कोणाचा शत्रू नसतो, तो फक्त वैचारिक विरोधक असतो, अशी भूमिका जितेंद्र आव्हाड यांनी मांडली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here