जितिन प्रसाद यांनी प्रियंका गांधींमुळे काँग्रेसला सोडले, उत्तर प्रदेश काँग्रेसला मोठा फटका !

235
Former Union Minister Jitin Prasad today joined the BJP, defeating the Congress

माजी केंद्रीय मंत्री जितिन प्रसाद यांनी आज कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. उत्तर प्रदेशात राहुल गांधी यांचे अगदी जवळचे आणि राजकीय ताकत असलेले जितिन यांनी प्रियांका गांधी यांच्यामुळेच कॉंग्रेस सोडली असे बोलले जात आहे.

2022 च्या उत्तर प्रदेश निवडणुकीत हा कॉंग्रेसला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. तर याउलट राजकीय वर्तुळात जितिन प्रसाद यांनी कॉंग्रेस का सोडली? याची चर्चा सुरु असली तरी प्रियंका गांधी यांच्यामुळे प्रसाद यांनी कॉंग्रेस सोडल्याचे समोर येत आहे.

2019 मधे जितिन प्रसाद कॉंग्रेस सोडतील आणि भाजपात प्रवेश घेतील अशी चर्चा आहे. दोन वर्षांपासून त्यांच्या मनात एक कॉंग्रेसचा त्याग करण्याचा विचार घोळत होता.

खुद्द रणदीप सुरजेवाला यांनी माध्यमांना सांगितले होते की जितिन कॉंग्रेस सोडत नाहीत, पण काही कॉंग्रेस सोडत असल्याचे सांगायला जितीन प्रसाद माध्यमांसमोर आलेच नाहीत.

Priyanka Gandhi

उत्तर प्रदेशच्या राजकारणातील जितिन हे एक प्रमुख व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. परंतु उत्तर प्रदेशात प्रियंका गांधींनी राजकीय हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली तेव्हापासून जितिन यांची नाराजी वाढू लागली होती.

जेव्हा प्रियंका व जितीन यांच्या वाद वाढू लागला, तेव्हापासून पक्षीय निर्णयांत जितिन यांना बाजूला करण्यात येत होते. त्यांना राहुल गांधी जितके महत्त्व देत होते तेवढे महत्त्व त्यांना मिळत नव्हते.

ज्योतिरादित्य शिंदे, सचिन पायलट आणि जितिन प्रसाद असे काही तरुण नेते गांधी परिवाराचे जवळचे होते. उत्तर प्रदेशच्या सर्व निर्णयांमध्ये जितिन केंद्रीय स्थानी मुख्य भूमिकेत असायचे.

2019 मधील लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे राज बब्बर यांनी कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.त्यानंतर जितिन प्रसाद यांना अध्यक्ष बनवण्याची चर्चा होती.

मात्र प्रियंकाने जितिन यांना बाजूला सारून पक्षाची लगाम अजय लल्लू यांच्याकडे दिली होती. इतकेच नव्हे तर प्रसाद यांना उत्तर प्रदेशमधील निर्णय घेण्याच्या प्रक्रियेपासून दूर ठेवले जात होते.

त्याच्या जवळच्या नेत्यांनाही जिल्हा संघटनेतून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला. जितिन यांना दूर ठेवण्यासाठी कॉंग्रेसने त्यांना पश्चिम बंगालमधील निवडणुका प्रभारी पाठवले होते. या सर्व प्रकारामुळे जितिन प्रसाद अस्वस्थ झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here