कोलकाता उच्च न्यायालयात नोकरीची संधी | 1,73,200 रुपये मिळणार पगार

240

नवी दिल्लीः कोलकाता उच्च न्यायालयाने 159 पदांच्या भरतीसाठी अर्ज मागितले आहेत.

या भरतींतर्गत डेटा एंट्री ऑपरेटर (DEO), सिस्टम अॅनालिस्ट, ज्येष्ठ प्रोग्रामर आणि सिस्टम मॅनेजर या पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

पात्र आणि इच्छुक उमेदवार संबंधित वेबसाईटवर ऑनलाईन भरतीसाठी अर्ज करू शकतात.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जानेवारी 2021

शैक्षणिक पात्रता
डेटा एंट्री ऑपरेटर (DEO) पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेकडून दहावी पास प्रमाणपत्र घ्यावे लागणार आहे.

याशिवाय त्यांच्याकडे कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेकडे किमान एक वर्षाचा डिप्लोमा इन कॉम्प्युटर अॅप्लिकेशनचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

त्याचबरोबर इतर सर्व पदांवर अर्ज करणारे उमेदवार, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान किंवा संगणकशास्त्रात पदव्युत्तर पदवी आवश्यक आहे.

वय श्रेणी
डेटा एंट्री ऑपरेटरसाठी (DEO) – 18 वर्षे ते 40 वर्षे
सिस्टम अनालिस्टसाठी – 26 वर्षे ते 40 वर्षे
वरिष्ठ प्रोग्रामर, सिस्टम मॅनेजर – 31 वर्षे ते 45 वर्षे
(राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी जास्तीत जास्त वयोमर्यादा शिथिल करण्याची तरतूद आहे. उमेदवारांच्या वयानुसार 1 जानेवारी 2021 पर्यंत वय ग्राह्य धरले जाईल.)

  • पदाचे वर्णन
    डेटा एंट्री ऑपरेटर (DEO) साठी – 153 पदे
  • सिस्टम एनालिस्टसाठी – 3 पदे
  • सिस्टम मॅनेजरसाठी – 2 पदे
  • वरिष्ठ प्रोग्रामर- -1 पद

किती पगार मिळणार?

  • डेटा एंट्री ऑपरेटर (DEO) साठी – दरमहा 22700 ते 58500 रुपये पगार
  • सिस्टम अ‍ॅनालिस्टसाठी – दरमहा 56100 ते 144300 रुपये पगार
  • सिस्टम मॅनेजरसाठी – दरमहा 67300 ते 173200 रुपये पगार
  • वरिष्ठ प्रोग्रामरसाठी – दरमहा 67300 ते 173200 रुपये पगार

कोलकाता उच्च न्यायालय डीईओ भरती: महत्त्वाच्या तारखा
ऑनलाईन अर्ज प्रारंभ – 11 जानेवारी 2021
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख – 27 जानेवारी 2021
फी जमा करण्याची शेवटची तारीख – 27 जानेवारी 2021
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख – 28 जानेवारी 2021

अधिक माहितीसाठी लिंक ओपन करा

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here