करिना कपूर लवकरच दुसऱ्यांदा आई होणार आहे. या दिवसांत ती गरोदरपणाचा आनंद घेत आहे. मोठ्या सुट्टीवर जाण्यापूर्वी तिने उरलेली सगळी कामं पूर्ण केली.
करिना कधी ब्रॅण्डच्या जाहिरातींच्या शूटमध्ये जाताना दिसते तर कधी ती आपल्या रेडिओ शोमध्ये व्यग्र असते. या सर्वांचं चित्रीकरण तिने आधीच करून ठेवलं होतं.
दरम्यान, करिनाने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती थिरकताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये करिनाने केशरी रंगाचा फुल स्लीव्ह टॉप आणि रोझ गोल्ड स्कर्ट घातला आहे.
करीना या आकर्षक कपड्यांमध्ये ती अजूनच सुंदर दिसत आहे. करिनाच्या आगामी सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ती आमिर खानसोबत ‘लालसिंग चड्ढा’ सिनेमात दिसणार आहे.
तिने नुकतंच याचं चित्रीकरणाचं पूर्ण केलं. सध्या सिनेमावर पोस्ट प्रोडक्शनचं काम सुरू आहे. याशिवाय ती बर्याच ब्रँड अॅन्डोर्समेन्टचं चित्रीकरणही सातत्याने करत आहे.
करिनाने तिचे योगासन करतानाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. याशिवाय ती इन्स्टाग्रामवर तैमुर आणि सैफ अली खानसोबतचे अनेक फोटोही चाहत्यांसाठी शेअर करत असते.
सध्या करिना तिचा जास्तीत जास्त वेळ कुटुंबासोबत आणि मुलगा तैमुरसोबत घालवत आहे. यासोबतच योग साधना करून ती आपल्या आणि होणाऱ्या बाळाच्या आरोग्याचीही काळजी घेत आहे.