Kareena Trolls on Social Media | नेटकरी म्हणाले : इब्राहिम, तैमुरनंतर आता बाबर का?

156
http://rajnetanews.com/good-news-kareena-saif-little-nawab-arrives-at-kareena-saifs-house-again/

मुंबई: अभिनेत्री करिना कपूर आणि सैफ अली खान दुसऱ्यांदा आई-बाबा झाले आहेत. २१ फेब्रुवारीला मुंबईच्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये करिनानं गोंडस मुलाला जन्म दिला. 

करिना किंवा सैफनं अद्याप याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही. पण फोटो जर्नलिस्ट विरल भयानी यांनी याबाबत सोशल मीडियावर पोस्ट केली आहे ज्यानंतर चाहत्यांनी करिना आणि सैफवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. पण यासोबत काही युझर्स या दोघांना ट्रोल सुद्धा करत आहेत.

  • करिना कपूर दुसऱ्यांदा आई झाली आहे. मागच्या काही दिवसांपासून तिच्या डिलिव्हरी बद्दल वेगवेगळे अंदाज बांधले जात होते. अखेर तिनं मुलाला जन्म दिला. त्यानंतर सोशल मीडियावरून सैफ आणि करिनाला चाहते शुभेच्छा देत आहेत. पण काहीजण त्यांना मुलाच्या नावाच्या मुद्द्यावरून ट्रोल सुद्धा करत आहे. 

सैफच्या मोठ्या मुलाचं नाव इब्राहिम आहे. त्यानंतर करिना आणि सैफच्या पहिल्या मुलाचं नाव तैमूर ठेवण्यात आलं होतं. त्यामुळे आता तिसऱ्या मुलाचं नाव बाबर ठेवणार का असा प्रश्न काही युझर्सनी केला आहे.

करिना आणि सैफ यांनी घरात पुन्हा एकदा गोड बातमी असल्याचं काही महिन्यांपूर्वी चाहत्यांसोबत शेअर केलं होतं. फेब्रुवारी महिन्यात करिना बाळाला जन्म देणार असल्याची माहितीही त्यानं दिली होती.

ही गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केल्यानंतर करिनाच्या गरोदरपणाचीही प्रचंड चर्चा झाली. नवव्या महिन्यापर्यंत करिनानं तिचं काम सुरूच ठेवलं होतं.

AssignmentImage-1744753286-1613890727

दरम्यान, दुसऱ्या बाळाच्या स्वागतासाठी सैफ आणि करिना काही दिवसांपूर्वीच नव्या घरात शिफ्ट झाले आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांच्या या घरी गिफ्ट पाठवले जात असतानाचा एक व्हिडीओ सुद्धा व्हायरल झाला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here