ख्वाजा युनूस ते मनसुख हिरेन एक वादग्रस्त पोलीस अधिकारी : सचिन वाझे

194
encounter specialist sachin vaze_

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून खळबळ उडवून देणारे स्फोटक प्रकरण वेगळ्या वळणारवर येऊन ठेपले आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके आढळणे.

त्यानंतर एकदम स्फोटके ठेवलेल्या कारचा मालक बेपत्ता होणे, दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह मिळणे, या प्रकरणात सचिन वाझे यांचे नाव येणे आणि त्यांना अटक करणे असा सगळा फिल्मी स्टाइल थरार या प्रकरणात पहायला मिळाला.

अनेक नाट्यमय वळणांनी घेरलेल्या या प्रकरणात वाझे यांना अटक झाल्यानंतर अनेक प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे. मुख्य म्हणजे ख्वाजा युनूस प्रकरणावरून वाझे यांच्या कारकीर्दीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

मुंबईतील घाटकोपर येथे २ डिसेंबर, २००२ मध्ये बसमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. या स्फोटात दोघाचा मृत्यू तर ३९ जणांना मृत्यू झाला होता. या प्रकरणात औरंगाबाद येथील ख्वाजा युनूस या तरुणाला अटक करण्यात आली होती.

 एनकाउंटर स्पेशलिस्ट सचिन वाझे

तो पेशाने इंजिनीअर होता. त्याला चौकशीसाठी औरंगाबादला नेत असताना एका घाटात पोलिसांच्या वाहनाला अपघात झाला आणि युनूस पळून गेला. पोलिस दप्तरी तो फरार असल्याचे नमूद आहे.

मात्र, युनूस याला पोलिसांनी बेदम मारले होते. त्यात त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप युनूस याच्या कुटुंबीयांनी केला. या प्रकरणाचा सीआयडीने तपास केला आणि युनूसचा मृत्यू कोठडीत झाल्याचे समोर आले. ६ जानेवारी, २००३ रोजी चौकशी सुरू झाली होती.

युनूसला बेदम मारहाण

कोर्टाने हे प्रकरण सीआयडीकडे दिल्यानंतर चौकशी सुरू झाली. यात अनेक बाबी समोर आल्या. युनूसला कपडे काढून पट्ट्याने बेदम मारले होते. याची साक्ष एका साक्षीसाराने कोर्टात दिली.

या प्रकरणात १४ जणांना दोषी ठरवले तर चौघांवर खटला सुरू ठेवला. यात सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांच्यासह चार पोलिसांवर खटला चालला. पुढे २००४ मध्ये त्यांना निलंबित करण्यात आले.

शनिवारी व्हॉटस ॲप स्टेटसमध्ये उल्लेख केलेले प्रकरण म्हणजे हेच ते निलंबन प्रकरण. या प्रकरणात आपल्याला गोवल्याची भावना वाझे यांच्यात होती. त्यांनी २००७ मध्ये राजीनामा दिला. त्यावेळी तपास सुरू असल्याने नामंजूर करण्यात आला होता.

ख्वाजा युनूस ते मनसुख हिरेन

ख्वाजा युनूस याला कोठडीत बेदम मारहाण केल्याने रक्ताच्या उलट्या होऊन तो मृत्यूमुखी पडला, पुढे हे प्रकरण उघडकीस येऊ नये म्हणून त्याचा मृतदेह जाळून टाकला होता.

परगावी  चौकशीसाठी नेत असल्याचा बहाणा करत तो गाडी उलटल्यानंतर फरार झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

मनसुख हिरेन मौत मामले में एटीएस ने सचिन वाझे से 10 घंटे की प

मात्र, युनूस याच्या कुटुंबीयांनी कोर्टात धाव घेत पोलिसांनाच बेड्या ठोकण्यास भाग पाडले. नुकत्याच स्फोटक प्रकरणातही नाट्यमयता आहे.

वाझे यांचे नाव या केसमध्ये आल्यानंतर ख्वाजा युसून प्रकरणही चर्चेत आले आहे. मनसुख हिरेन यांच्याकडील गाडी ही दुरुस्तीसाठी आणली होती.

ही गाडी मुंबईकडे जाताना ऐरोलीजवळ बंद पडली. पुढे ती चोरीला गेली, नंतर ती कार अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांसह आढळली. त्याचा तपास सुरू असताना अधिवेशनात चर्चा सुरू झाली.

दुपारी याची चौकशी करण्याबाबात संथगतीने चर्चा सुरू होती. दुपारी मनसुख हिरेन यांचा मृतदेह मिळताच एकच खळबळ उडाली आणि विरोधी पक्षाने वाझे यांचे नाव अग्रस्थानी आणत त्यांना अटक करण्याची मागणी केली. यात वाझे यांचा काहीच संबंध नसल्याचे सत्ताधारी सांगत होते.

मात्र, वाझेंनी ठाणे कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. तो अर्ज फेटाळल्यानंतर त्यांना शनिवारी रात्री अटक झाली. युनूस प्रकरणात केवळ निलंबनावर थांबलेले प्रकरण अटकेने पुर्ण झाले.

वाझे यांची कारकीर्द पाहिली तर ते आक्रमक अधिकारी म्हणून गणले जातात. तब्बल ६३ एन्काउंटर त्यांच्या नावावर आहेत. काही दिवसांपूर्वी पत्रकार अर्णब गोस्वामी याला घरातून अटक करण्यात सचिन वाझे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

अंबानी यांच्या घरासमोर ठेवलेली स्फोटकं वाझे यांनी ठेवली होती का? मनसुख हिरेन यांची गाडी चार महिने वाझेच्या ताब्यात होती का? हिरेन यांच्याकडून जबरदस्तीने अर्ज लिहून घेतली का? हिरेन यांचा खून वाझे यांनी केला का? की या प्रकरणात वाझे यांना गुप्तवार्ता विभागाच्या अधिकाऱ्यांनी अडकवले आहे का? या प्रश्नांची उकल एनआयएच्या चौकशीत होईल.

वाझेंचा जामीन का फेटाळला?

जाणीवपूर्वक किंवा अजाणतेपणाने स्फोटकं बाळगणे, इतरांच्या जीवाला धोका होईल असं वर्तन करणे खोट्या किंवा बनावट गोष्टी करणे (या गुन्ह्यात तुरुंगवासाची शिक्षाही होऊ शकते) दिशाभूल करण्यासाठी केल्या जाणाऱ्या बनावट कृती दहशत निर्माण करणं किंवा धमकी देणे गुन्हेगारी स्वरुपाच्या षडयंत्रात सहभाग घेणे स्फोटक पदार्थ कायदा 1908 कलम 4 अ, ब – स्फोटकं बाळगणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here