कॉल सेंटरमध्ये काम करणा-या तरुणीचा पाठलाग करून तिला टिंगरेनगर रस्त्यात अडविले.
जबरदस्तीने गाडीवर खराडी परिसरात घेऊन जात तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना गुरूवारी पहाटे तीन ते चार दरम्यान घडली.
याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत धानोरी परिसरातील एका 20 वर्षीय पीडित तरुणीने तक्रार दिली आहे.
त्यानुसार एका मोटारसायकलवरील तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी खराडी परिसरातील एका कॉल सेंटरमध्ये कामाला आहे.
गुरूवारी पहाटे तीनच्या सुमारास ती दुचाकीवरून धानोरीला घरी चालली होती. त्यावेळी आरोपीने तिचा पाठलाग करून टिंगरेनगर परिसरात अडविले. त्यानंतर तिला मारहाण करून त्याच्या दुचाकीवर बसविले.
त्यानंतर तरुणीला पुन्हा खराडी परिसरातील निर्मनुष्य ठिकाणी नेउन बलात्कार केला. त्यानंतर आरोपीने तरूणीला गुंजन चौक परिसरात आणून सोडल्यानंतर तिने मित्राला घटनेची माहिती दिली.
त्यानंतर त्यांनी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. याप्रकरणी विश्रातवाडी पोलिस तपास करीत आहेत.