अहमदाबाद : गुजरातमधील (Gujrat) सुरेंद्रनगर जिल्ह्यातील सारा गावात राहणाऱ्या एका जोडप्याने साडीला गळफास घेऊन राहत्या घरी आत्महत्या (Sucide) केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.
आज पहाटे त्यांचे मृतदेह घराच्या छताला लटकलेल्या अवस्थेत दिसले. मृत जोडप्याने 6 वर्षांपूर्वी प्रेम विवाह केला होता आणि तेव्हापासून ते एकत्र राहत होते. मृत बलदेव हे 42 वर्षांचे तर त्यांची पत्नी हेमा 25 वर्षांची होती.
मात्र, घटनास्थळाहून कोणताही सुसाइड नोट न मिळाल्याने पोलीस हत्या आणि आत्महत्या अशा दोन्ही अँगलने तपास करीत आहे.
वेगवेगळ्या खोलीत मिळाले मृतदेह
गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार बलदेव आणि हेमा यांच्यामध्ये चांगले संबंध होते. लग्नाच्या 6 वर्षांमध्ये दोघांमध्ये कधीही भांडण झाल्याचं पाहण्यात आलं नाही. त्यांचा संसार सुखात होता.
त्यामुळे आत्महत्येबाबत शंका उपस्थित केली जात आहे. दुसरीकडे दोघांचे मृतदेह वेगवेगळ्या खोलींमध्ये सापडले. त्यामुळे पोलिसांनाही शंका व्यक्त केली आहे. जर दोघांना आत्महत्या करायची असती तर त्यांचे मृतदेह वेगवेगळ्या खोलीत का?
दोघांमध्ये वयाचं अंतर जास्त असल्याने केली जात होती चर्चा
दाघोलिया गावचे बलदेव यांचं कुटुंब सरा गावात राहत होतं. शिवाय दुसरीकडे शेतीचं काम करीत होते. यादरम्यान 36 वर्षांच्या बलदेव यांचे गावात राहणाऱ्या 19 वर्षीय रेखासोबत प्रेम जुळले. दोघांनी तातडीने लग्न करण्याचा निर्णय घेतला.
सुरुवातील कुटुंबीय या लग्नाला परवानगी देत नव्हते. मात्र दोघे जिद्द करीत असल्याने कुटुंबीय लग्नास तयार झाले. त्यात दोघांच्या वयामध्ये 17 वर्षांचं अंतर असल्याकारणाने त्यांच्या लग्नाची गावात खूप चर्चा सुरू होती.