Latur coron vaccination : लातूरमध्ये कोरोना लसीकरणासाठी गर्दी | नागरिकांची गर्दी नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना पाचारण केले !

492

लातूर जिल्ह्यातीलगेल्या काही दिवसांपासून बंद असलेल्या लसीकरण आज पुन्हा सुरू झाले आहे. 

काही केंद्रांवर लसीकरण सुरू असल्याने लातूरकर आज सकाळपासूनच लसीकरण केंद्रावर गर्दी करत असल्याचे दिसून आले. गर्दी नियंत्रित करण्यासाठी काही ठिकाणी पोलिसांना पाचारण करण्यात आले होते.

गेल्या काही दिवसांपासून लातूर शहर व जिल्ह्यात लसीकरण थांबविण्यात आले होते. लस उपलब्ध नसल्याने नागरिक त्रस्त झाले. 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींसाठी शहरात दोन ठिकाणी फक्त 200 लस उपलब्ध आहेत. यापूर्वी ऑनलाईन नोंदणी आवश्यक होती.

जिल्ह्यात काही ठिकाणी लसीकरण सुरू असल्याचे जाहीर करण्यात आले. दुसरा डोस घेण्यासाठी नागरिक सकाळपासूनच रांगा लावत आहेत. काही ठिकाणी गर्दीमुळे पोलिसांना पाचारण करण्यात आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here