Latur Corona Upadate | लातूर जिल्ह्यात कोरोनाने चार जणांचा मृत्यू 

195

लातूर जिल्ह्यात २८ डिसेंबर रोजी कोरोनाची लागण झालेल्या चारजणांचा मृत्यू झाला. तर सोमवारी २१ कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची भर पडली.

आरटीपीसीआर टेस्टमध्ये १२ तर रॅपिड अँटिजेन टेस्टमध्ये ९ असे मिळून २१ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण सोमवारी सापडले. चार जणांचा कोरोना मृत्यू झाला.

लातूर जिल्ह्यात सोमवारचे धरून आजवर ६७३ कोरोना रूग्ण दगावले आहेत. सोमवारी चार जणांचा मृत्यू झाल्याने धक्काच बसला.

रविवारी १८, सोमवारी २१ असे कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या कमी होत असल्याचे समाधान असतानाच चार जण दगावल्याने चिंतेत भर पडली आहे.

लातूर जिल्ह्यात आतापर्यंत २२ हजार ८८० कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. यातील २१ हजार ८९८ रूग्ण बरे होऊन आपापल्या घरी गेले आहेत. सध्या रूग्णालयात १५८ रूग्ण उपचार घेत आहेत.

सोमवारी एकूण आरटीपीसीआर टेस्ट ४०१ झाल्या. तर रॅपिड अँटिजेन टेस्ट १८४ झाल्या. यातून २१ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here