Latur Corona Update | जिल्ह्यात १६४७ नवे पॉझिटिव्ह, तिघांचा मृत्यू 

422
Corona Update Latur

Latur Corona Update | जिल्ह्यात रविवारी सायंकाळपर्यंत तब्बल १६४७ नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली, तर तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यातील वाढत्या रुग्ण संख्येने प्रशासन व नागरिकांची चिंता वाढली आहे.

या पॉझिटिव्ह रुग्णसंख्येमुळे जिल्ह्यात आता १० हजार १६० रुग्ण ॲक्टिव्ह असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाच्या अहवालात म्हटले आहे.

जिल्ह्यात १९०८ व्यक्तींची आरटी-पीसीआर तपासणी केली. त्यामध्ये ६४७ व रॅपिड ॲँटिजेनच्या ३९७९ तपासण्यांमध्ये १००० व्यक्ती पॉझिटिव्ह आढळल्या.

या नव्या रुग्णांमुळे जिल्ह्याची आतापर्यंतची पॉझिटिव्ह संख्या ४३ हजार ६२२ वर गेली आहे. तर आज तिघांचा मृत्यू झाल्याने एकूण मयतांचा आकडा ८०७ वर गेला आहे.

कोविड हॉस्पिटल्समध्ये सध्या २ हजार ९५४ रुग्ण, तर होम आयसोलेशनमध्ये ७ हजार २०६ रुग्ण उपचार घेत आहेत.

आज दिवसभरात ६६३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत ३२ हजार ६५५ जण उपचार घेऊन बरे झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here