Latur Corona Update | लातूर जिल्ह्यात 1486 उच्चांकी रूग्ण, तर 7 जणांचा मृत्यू 

610
Corona's fear increased | Corona breaks 2021 record in last 24 hours

लातूर जिल्ह्यात शनिवार (दि.10 एप्रिल ) 1486 कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांचा उच्चांकी आकडा नोंदला गेला. तर 7 जणांचा कोरोना विषाणूची लागण होऊन मृत्यू झाला.

लातूर जिल्ह्यातील 31992 रुग्ण उपचाराने आजपर्यंत बरे झाले आहेत. आज नवीन 1486 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. दुर्दैवाने उपचारादरम्यान 7 रुग्णाचा मृत्यू झाल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे.

  • लातूर जिल्ह्यात 2093 आरटीपीसीआर तपासण्या करण्यात आल्या. त्यामध्ये 557 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले.
  • 4200 रॅपीड अ‍ॅन्टीजीन टेस्ट करण्यात आल्या. त्यामध्ये 929 जण पॉझिटिव्ह आढळून आले.
  • जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 42000 झाली आहे. उपचार घेत असलेल्या 9204 आहे.
  • लातूर जिल्ह्यात आजपर्यंत 804 रुग्णांचा मृत्यू झाला असून उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णांची संख्या 31992 आहे.
  • आज बरे झालेल्या रुग्णांची संख्या 582 आहे. आरटिपीसीआर मधील 1740 अहवाल प्रलंबित आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here