लातूर जिल्ह्यातील 68 हजार 469 रुग्ण उपचाराने आजपर्यंत बरे झाले आहेत. दि.9 मे रोजी नवीन 957 कोराेणा बाधित रुग्ण आढळले आहेत.
उपचारादरम्यान 29 रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे. लातूर जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 84.53 टक्के असल्यामुळे समाधान व्यक्त केले जात आहे.
लातूर जिल्ह्यात 1557 आर्टिफिशियल चाचणीसाठी नमुने घेण्यात आलेले आहेत. 261 अहवाल प्रलंबित आहेत, 328 कोरणा बाधित रुग्ण आढळून आले आहेत. कालच्या प्रलंबित मधील 100 पॉझिटिव्ह आले आहेत.
2262 रॅपिड एंटीजन टेस्ट करण्यात आल्या. त्यामध्ये 529 जन पॉझिटिव्ह आढळून आले. जिल्ह्यातील कोरणा बाधित रुग्णांची संख्या 80 हजार 992 झाली आहे. सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या दहा हजार 968 आहे.
लातूर जिल्ह्यात आजपर्यंत पंधराशे 55 रुग्णांचा मृत्यू झाला असून उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णांची संख्या 68 हजार 469 आहे. रविवारी बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1081 आहे.
जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून काेराेनासंबंधी चाचण्याही आरोग्य विभागाने वाढविल्या आहेत दि 9 मेपर्यंत जिल्ह्यात चार लाख 72 हजार 75 जणांच्या चाचण्या झालेले आहेत.
त्यात एक लाख 79 हजार 616 जणांच्या आर्टिफिशियल चाचण्या झाले आहेत यात 31 हजार 178 जन पाॅझेटीव्ह आले आहेत दोन लाख 92 हजार 459 जणांच्या अँन्टीजन चाचण्या झाल्या आहेत त्यात 49 हजार 805 जन पाॅझेटीव्ह आले आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत 80 हजार 992 जणांना कोराेणाची बाधा झाली आहे जिल्ह्यात कोरणा बाधित रुग्णांची संख्या वाढत असली तरी त्यात गंभीर रुग्णांची संख्या कमी होत आहे. सध्या अॅक्टीव्ह 10 हजार 968 रुग्ण आहेत.
त्यापैकी आठ हजार अठरा रुग्ण हे अत्यंत साैम्यलक्षणी असलेली आहेत, गंभीर रुग्णांचे प्रमाण कमी आहे. रुग्ण मोठ्या संख्येने बरे होऊन घरी जात आहेत. सध्या परिस्थितीत आणखी आटोक्यात आणण्यासाठी नागरिकांनी शासनाच्या उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करण्याची गरज आहे.