Latur Corona Update | लातूर जिल्ह्यात 45 वर्ष व त्यावरील वयोगटासाठीचे लसीकरण केंद्र व वेळापत्रक निश्चित

541

लातूर : लातूर जिल्हयातील कोवीड-19 लसीकरणाचे दिनांक 26 मे रोजीचे वेळापत्रक आहे.

ज्यांचे वय 45 वर्ष व त्यावरील आहे त्या वयोगटासाठीचे लसीकरण केंद्र पुढील प्रमाणे राहणार आहे.

उपजिल्हा रुग्णालय उदगीर, उपजिल्हा रुग्णालय निलंगा, ग्रामीण रुग्णालय अहमदपूर, ग्रामीण रुग्णालय औसा, ग्रामीण रुग्णालय चाकूर, ग्रामीण रुग्णालय देवणी, ग्रामीण रुग्णालय जळकोट, ग्रामीण रुग्णालय बाभळगाव, ग्रामीण रुग्णालय मुरुड, ग्रामीण रुग्णालय कासारशिरसी,ग्रामीण रुग्णालय रेणापूर, ग्रामीण रुग्णालय किल्लारी व जिल्हयातील सर्व प्रा. आ.केंद्र व कार्यक्षेत्र लसिच्या उपलब्धतेनुसार व सुक्ष्मकृती आराखडयानुसार पहिला व दुसरा डोस, कोविशिल्ड लस, ऑनस्पॉट सकाळी 10 ते सायं. 5 वाजेपर्यंत सुरु राहणार आहे.

45 वर्ष व त्यावरील वयोगटातील लाभार्थीसाठी लातूर जिल्हयात सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व त्यांचे कार्यक्षेत्रात उपलब्धसाठयानुसार व प्रा.आ.केंद्राच्या सुक्ष्मकृती आराखडयानुसार दिनांक 26 मे रोजी कोवीशिल्ड लसीचे लसीकरण करण्यात येत आहे.

लातूर जिल्हयातील नागरीकांनी कोवीड-19 लसीकरणाबाबत काही अडचण असल्यास 02382-223002 कोवीड हेल्पलाईन नंबरवर संपर्क करावा असे अवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here