Latur Covid 19 Help Center | लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात कोव्हिड-19 मदत केंद्राची स्थापना

734

लातूर : राज्यातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय लातूर तर्फे मदत केंद्र सूर करण्यात आले आहे.

लातूर येथील मदत केंद्रातर्फे जिल्ह्यातील सर्व शासकीय तसेच मान्यताप्राप्त कोव्हिड-19 रुग्णांना बेडची उपलब्ध्ता तसेच बेड उपलब्ध असलेल्या हॉस्पिटलचे नाव, त्यामध्ये विना ऑक्सिजन बेड, ऑक्सिजनसह बेड व व्हेंटीलेटर बेड इत्यादीची माहिती दिली जाणार आहे.

जिल्ह्यातील नागरिकांच्या कोव्हिड संदर्भात इतर समस्यांबाबत संपर्क करण्याकरिता 02382-223002 या टोल फ्री क्रमांकावर नागरिकांनी फोन करुन माहिती घ्यावी.

सोबतच सदरच्या नियंत्रण कक्षात 24 तास चार कर्मचाऱ्यांच्या शिफ्ट मध्ये नेमणूका केलेल्या असून आपणास बेड उपलब्धेबाबत 24 तास माहिती दिली जाईल. नागरिकांनी या मदत केंद्राच्या मदतीने कोविड स्टेट्सबद्दल माहिती घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here