लातूर : जिल्ह्यात (Latur distric) माणुसकीला काळीमा फासणारी संतापजनक घटना समोर आली आहे.
जन्मदात्या बापानेच दारुच्या नशेत आपल्या दीड वर्षीय मुलीला हौदात बुडवून जीवे मारल्याची धक्कादायक घटना आशिव (ता. औसा ) (Ashiv Tal. Ausa) येथे घडली आहे.
या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, निष्पाप चिमुकलीला आपले प्राण गमवावे लागल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
याप्रकरणी मृत मुलीच्या आजोबांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सृष्टी संतोष भोंडे (Srishti Santosh Bhonde) (वय दीड वर्ष ) असे मृत चिमुरडीचे नाव आहे.
तर संतोष भोंडे असे गुन्हा दाखल झालेल्या क्रूरकर्मा बापाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 11 वर्षापूर्वी पूजा हिचा विवाह आशिव येथील संतोष भोंडे (Santosh Bhonde) यांच्याशी झाला होता.
त्यांना 1 मुलगा विश्व आणि ईश्वरी व सृष्टी अशा 2 मुली होत्या. मात्र संतोष (Santosh Bhonde) दारूच्या आहारी गेल्याने तो पूजाला सतत मारहाण करत असत.
त्याच्या जाचाला कंटाळून पूजाने महिला तक्रार निवारण तसेच भादा पोलीसात तक्रार केली होती. मात्र संतोषमधे (Santosh Bhonde) काही बदल झाला नाही, उलट त्याचे व्यसन वाढत गेले.
तो व्यसनाच्या इतका आहारी गेला की त्याने दारूच्या नशेत अखेर पोटच्या पोरीचाच जीव घेतला.
घरातील सगळे शेतात गेले असताना दीड वर्षीय श्रुष्टीला त्याने मारहाण करून घरातील हौदात बुडवले.
ही घटना श्रुष्टीच्या भावंडांनी रात्री घरी आजोबाला सांगितली. आजोबाच्या फिर्यादीवरून संतोषवर भादा पोलीस ठाण्यात गुन्हा करण्यात आला आहे. भादा पोलीस (Bhada police ) तपास करत आहेत.