लातूर : येथील आर्वी भागातील डाळमिलच्या पाठीमागे राहणाऱ्या अल्पवयीन मुलीस अज्ञात व्यक्तीने फूस लावून तिला पळवून नेल्याची घटना घडली.
याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, रेणापूर तालुक्यातील सिंदगाव येथील महिला आपल्या अल्पवयीन मुला मुली सह आर्वी भागातील डाळ मिलच्या पाठीमागे राहत होती.
दि.19 मे रोजी फिर्यादीची पंधरा वर्षे आठ महिने वयाची मुलगी कोणालाही काही न सांगता अचानक घरातून निघून गेली. लातूर शहरासह परिसरातील नातेवाईकाकडे सर्वत्र शोध घेऊन ती सापडली नाही.
त्यामुळे 28 मे रोजी मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.