अहमदपूर : मुलीस मारहाण करून विनयभंग केल्याप्रकरणी कोपरा किनगाव येथील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, सदस्यांसह 16 जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी महिलेवरही अट्रोसिटीचा आणि शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गावातील भवानी मातेचे मंदिर अतिक्रमण केलेल्या जागेत आहे, ते पाडण्यास गेलेल्या लोकांनी विरोध करणाऱ्या तरुणीस विनयभंग करत जबर मारहाण केल्याचा घटना अहमदपूर तालुक्यातील कोपरा किणगाव या गावात घडली आहे.
या प्रकरणी 16 लोकांविरोधात किणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील कोपरा किनगाव येथे भवानी मातेचे मंदिर आहे.
गावातील सरपंच आणि इतर लोकांकडून ते मंदिर काढण्यासाठी प्रयत्न सुरू होते. कारण हे मंदिर अतिक्रमित जागेवर आहे, त्यामुळे ते काढावे लागेल असे त्यांचे मत होते.
दि.12 रोजी सरपंच गंगाधर डेपे आणि इतर 15 लोक तिथे गेले. सोबत जेसीबी नेण्यात आला होता. जागा साफ करण्याचे काम सुरू होते. त्यावेळी फिर्यादी महिला त्या ठिकाणी आली. महिलेने विरोध करण्यास सुरुवात करत पाड कामाचे आदेश आहेत का? असा प्रश्न केला.
यावरून संतप्त झालेल्या लोकांनी काठीने सदरील महिलेस जबर मारहाण केली. या भांडणात काही महिलाही सामील होत्या. फिर्यादी महिलेस चावण्यात आले. दगडाने मारहाण करण्यात आली.
गुप्तांगावर दगडाने मारहाण केल्यामुळे महिला गंभीर जखमी झाली आहे. याघटनेनंतर पीडित महिलेने किणगाव पोलिसात तकार दिली आहे.
विनयभंगप्रकरणी 16 गुन्हा दाखल
या प्रकरणी सरपंच गंगाधर डेपे, उपसरपंच बालाजी आचार्य, ग्रामसेवक, प्रशांत आचार्य, कांचन आचार्य, राहूल कांबळे, गहिनीनाथ आचार्य, सुभाष टेलर, मैनाबाई आचार्य, मैनाबाईचा मुलगा, शिला आचार्य, संतराम ग्रामपंचायत सेवक, भुराबाई आचार्य, शांताबाई आचार्य, सुभाष टेलरची बायको, जेसीबी ऑपरेटर यांच्यासह 16 लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
येथे मुलीस मारहाण करून तिचा विनयभंग करण्यात आल्याप्रकरणी गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, सदस्यांसह 16 जणांविरुध्द गुन्हा किनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महिलेंवरही गुन्हा दाखल याच घटनेत ग्रामसेवक रवींद्र क्षीरसागर यांच्या फिर्यादी वरून दोन महिला विरोधात जातीवाचक शिवीगाळ करुन शासकीय कामात अडथळा निर्माण करण्यात आला आहे. अशी तक्रार देण्यात आली आहे. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून किणगाव पोलीस पुढील तपास करत आहेत.