Latur News | ग्राम पंचायत निवडणूकीसाठी दहा तालुक्यांतून ९९४० उमेदवारांचे अर्ज वैध

174

दहा तालुक्यांतून ९९४० उमेदवारांचे अर्ज वैध

लातूर जिल्ह्यातील लातूर, रेणापूर, औसा, निलंगा, देवणी, शिरूर अनंतपाळ, उदगीर, जळकोट, अहमदपूर व चाकूर या दहा तालुक्यांतून १२७ नामनिर्देशनपत्र छाननीत अवैध ठरले आहेत. तसेच ९९४० उमेदवारांचे अर्ज अंतिम छाननीत वैध ठरले आहेत.

लातूर जिल्ह्यातील ४०८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका सध्या सुरू आहेत. तालुकानिहाय ग्रामपंचायतींची संख्या अशी, लातूर ६४, रेणापूर २८, औसा ४६, निलंगा ४८, देवणी ३४, शिरूर अनंतपाळ २७, उदगीर ६१, जळकोट २७, अहमदपूर ४९, चाकूर २४ अशा एकूण ४०८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्र भरण्याची अंतिम मुदत ३० डिसेंबर २०२० होती. या दिवशी नामनिर्देशनपत्रांचा अक्षरश: पाऊस पडला.

त्यानंतर नामनिर्देशनपत्रांची छाननी झाली. या छाननीत लातूर तालुक्यातून २५, रेणापूर तालुक्यातून २, औसा २२, निलंगा १७, देवणी १९, शिरूर अनंतपाळ ३, उदगीर १०, जळकोट ५, अहमदपूर २० तर चाकूर तालुक्यातून ४, असे एकूण १२७ नामनिर्देशनपत्र अवैध ठरले. यानंतरही ९९८७ नामनिर्देशनपत्र वैध ठरले असून, छाननीअंती वैध ठरलेल्या उमेदवारांची संख्या ९९४० एवढी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here