Latur News Update | लातूर जिल्ह्यातील घटनांचा वेगवान आढावा

158

लातूर जिल्ह्यात १० जानेवारी २०२१ रोजी ५२ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. मात्र, रविवारी कोरोनाची लागण होऊन कोणाचीही मृत्यू झालेला नाही.

• रविवारी आरटीपीसीआर टेस्टमध्ये ३२ तर रॅपिड अँटिजेन टेस्टमध्ये २० असे एकूण ५२ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत.

• लातूर जिल्ह्यात आजवर २३ हजार ३०७ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण सापडले असून, यातील उपचार घेऊन २२ हजार ३२४ रूग्ण आपापल्या घरी गेले आहेत.

• सध्या रूग्णालयात ३०३ रूग्ण कोरोनाचे उपचार घेत आहेत. आजवर कोरोनाची लागण होऊन ६८० रूग्ण जिल्ह्यात दगावले आहेत.

• रविवारी आरटीपीसीआर टेस्ट एकूण ८३३ तर रॅपिड अँटिजेन टेस्ट एकूण ८८० झाल्या आहेत. रविवारी पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या वाढली आहे.

• पन्नासच्या पुढे कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांचा आकडा सरकल्याने थोडी चिंता व्यक्त केली जात आहे.

• अहमदपूर येथील इंदिरा गांधी महिला बचत गट व त्रिशा महिला बचत गटाच्यावतीने स्वच्छ भारत अभियानांतर्गत उत्कृष्ट स्वच्छता कर्मचारी म्हणून देविदास गंगाराम ससाणे यांचा सत्कार

• बोलेरो पिकअप व आयशर मेकर व्हीई कमर्शिअल व्हेईकल या दोन वाहनांचे बनावट कागदपत्र तयार करून 10 लाख 50 हजार रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल.

• जिल्ह्यात दिवसभरात आरटीपीसीआर टेस्टमध्ये 9 तर रॅपिड अँटिजेन टेस्टमध्ये 19 असे एकूण 28 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here