लाईफ केअर पुन्हा उभारी घेईल, कारण तुम्ही सोबत आहात : डॉ. अर्चना पाटील चाकूरकर
उदगीर : लाईफ केअर हॉस्पिटल जनसामान्यांच्या विश्वासाचे नावं आहे. चाकुरकर परिवारावरील विश्वास आहे. त्यामुळे चाकुरकर आणि लाईफ केअर हॉस्पिटल एकमेकांपासून वेगळे होणे शक्य नाही.
जनसामान्यांच्या आरोग्याची काळजी घेणारे हॉस्पिटल म्हणून लाईफ केअर ओळखले जाते. राज्य सरकारच्यावतीने लाईफ केअर हॉस्पिटलला काहीही अडचण येणार नाही. राज्यसरकार पूर्ण ताकतीने लाईफ केअरच्या मागे उभे राहील असा विश्वास ना.संजय बनसोडे यांनी लाइफ केअर हॉस्पिटलच्या कोविड सेंटर लोकार्पण प्रसंगी व्यक्त केला.
दि. 27 रोजी लाईफ केअर हॉस्पिटल अॅन्ड रिसर्च सेंटर येथे कोविड सेंटर सुरु करण्यात आले. त्याचे लोकार्पण ना.संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले. कोरोना योध्दा म्हणून शहरातील सर्व पत्रकारांना मोफत लसीकरण करण्यात आले.
याप्रसंगी बस्वराज पाटील नागराळकर, डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर, रमेश अंबरखाने, चंद्रकांत वैजापुरे, चंदर पाटील, डॉ. प्रकाश येरमे, केदार पाटील, शिरीष पाटील कौळखेडकर, डॉ. पुजा पाटील, डॉ.दत्ता पाटील, डॉ.बाळासाहेब पाटील, गिरिष पाटील, चंदन पाटील, शिवाजी मुळे, महेश बसपुरे, शांतवीर पाटील, इंजि.संतोष तोडकर आदी मान्यवर उपस्थित होते.
बस्वराज पाटील नागराळकर यांनी लाईफ केअर हॉस्पिटल अॅन्ड रिसर्च सेंटर उदगीर तालुक्याची खुप मोठी गरज आहे. शिवराज पाटील चाकुरकर यांच्या पुण्याईचा ठेवा यामागे आहे. अडचणी आल्या, त्यावर मात करता येईल. डॉ.अर्चना पाटील यांनी उदगीरकरांच्या सेवेचे व्रत घेतले आहे. त्याला आपण सर्वांनी साथ दिली पाहीजे. आगामी काळात लाईफ केअर हॉस्पिटल अॅन्ड रिसर्च सेंटर पुन्हा पूर्ववैभव प्राप्त करेल असे प्रतिपादन केले.
लाईफ केअर हॉस्पिटलच्या अध्यक्षा डॉ.अर्चना पाटील चाकुरकर म्हणाल्या की, लाईफ केअर हॉस्पिटल उदगीरकरांचे हॉस्पिटल आहे. आपल्यामुळे कोणालाही त्रास होवू नये म्हणून मध्यंतरी हॉस्पिटल चालवायला दिले होते. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे पुन्हा मी स्वतः हे हॉस्पिटल पुन्हा नव्या दमाने सुरु करीत आहे. अनेक अडथळे आहेत.
या अडथळ्यावर मात करुन लाईफ केअर हॉस्पिटल पुन्हा उभारी घेईल. कोणाचीही अडचण होणार नाही. कोणाला अडचणीत आणण्याचाही उद्देश नव्हता. काही चुका झाल्या. त्या चुका दूरुस्त करुन पुढे जायचे आहे.
लाईफ केअर हॉस्पिटल तुमची घेत आहे. तुम्ही तुमचे हॉस्पिटल म्हणून काळजी घ्या. हा सामुहिक व सामाजिक उपक्रम आहे. तुम्ही साथ द्या, मी पुन्हा हे हॉस्पिटल नव्या दमाने उभे करीन अशी भावनिक साद घातली.
डॉ.अर्चना पाटील चाकुरकर यांच्यासोबत राजकीय, सामाजिक, औद्योगिक क्षेत्रातील सर्वजण सोबत आहेत. अर्चना पाटील यांनी फक्त झेप घ्यावी, आम्ही बळ देण्यासाठी सदैव सोबत आहोत, असे सांगून रमेश अंबरखाने यांनी सर्वांचे आभार मानले.