लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतर्फे कर्जमाफी मिळालेल्या २२४३८ शेतकऱ्यांना ६७ कोटी रुपयांचे ‘कर्ज वाटप’

1086
Diliprao Deshmukh

माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर जिल्हा  मध्यवर्ती बँक राज्यात आघाडीवर असून बॅंकेने शेतकरी हा केंद्रबिंदू मानून वेळेत शेतकऱ्यांना पतपुरवठा केलेला आहे.

चालू हंगामात २०२०-२०२१ मध्ये जिल्ह्याच्या वार्षिक पतपुरवठा आराखड्यात जिल्हा बँकेस ३३ टक्के प्रमाणे पिक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले असून फेब्रुवारी २०२१ अखेर बँकेमार्फत ७४४ कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. उद्दीष्टाच्या ८१ टक्के पूर्तता बॅंकेने केली असून १०० टक्के उद्दीष्ट पुर्ण केले जाणार आहे.

शुन्य टक्के व्याजदराने पतपूरवठा 

विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था सभासदांना किसान क्रेडिट कार्ड योजेनेअंतर्गत कर्ज धोरणानुसार नविन ऊस लागवडीसाठी जास्तीत जास्त ३ लाख रुपये पर्यंतच्या मर्यादेस आधीन राहून सभासदाकडील उपलब्ध क्षेत्रानुसार ऊस पिकासाठी कर्ज वितरण करण्याचा निर्णय बँकेच्या वतीने घेण्यात आला आहे.

त्यानुसार कार्यकारी संस्थांच्या मागणीनुसार ऊस पीक कर्जास मंजूरी देण्यात आली असून कर्ज वाटपाची प्रक्रिया सुरू आहे.

शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याज दराने पतपुरवठा करण्याचा निर्णय राज्यात लातूर जिल्हा बँकेने प्रथमतः घेतला असून त्यानूसार कार्यवाही चालू आहे. अशी माहिती बँकेचे कार्यकारी संचालक हणमंत जाधव यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here