Lockdown Breaking News | पुण्यात पुन्हा ‘विकेंड लॉकडाऊन’ लागू होणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांची आढावा बैठकीनंतर घोषणा !

469
'Weekend lockdown' will be implemented again in Pune

पुणे : उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील कोरोना येथील परिस्थितीचा आढावा घेतला. यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन शनिवार व रविवार लॉकडाऊन जाहीर केले. 

शनिवारी व रविवारी सर्व दुकाने बंद ठेवली जातील. त्यामुळे पर्यटकांची गर्दी रोखण्यासाठी पुणे जिल्ह्यात शनिवार व रविवार लॉकडाउन लागू करण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

अजित पवारांनी कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन अजून कठोर निर्बंध लावण्याचा इशाराही पुणेकरांना दिला आहे. त्याच्या गाईडलाईन आढावा घेऊन जारी केले जातील असे सांगितले आहे.

अल्पवयीन मुलांकडून वर्गातील मुलीवर चाकूचा धाक दाखवून बलात्‍कार; मुलगी ७ महिन्यांची गर्भवती

अजित पवारांनी कोरोना परिस्थितीची दखल घेत पुण्यातील लोकांना कडक निर्बंध लादण्याचा इशारा दिला आहे. याशिवाय कोणत्याही कारणास्तव पुणे जिल्ह्याबाहेर जाणाऱ्याना पंधरा दिवसांसाठी आयसोलेशन मध्ये ठेवण्यात येणार आहे. नागरिकांनी पर्यटन स्थळांवर गर्दी करू नये असे आवाहनही त्यांनी केले आहे.

उपमुख्यमंत्र्यांनी आज आढावा बैठक घेतली. यात पुणे जिल्ह्यात शनिवार व रविवारी सर्व बंद राहील. फक्त जीवनावश्यक सेवांना परवानगी देण्यात येईल. पालकमंत्री म्हणाले की, हा नियम ग्रामीण भागातही लागू होईल. परिस्थिती नियंत्रणात आणल्यास नियम बदलले जातील, असे ते म्हणाले.

हे देखील जरूर वाचा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here