महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय.
राज्यातला लॉकडाऊन पुन्हा वाढणार आहे. राज्याचे मदत व पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी तसे संकेत दिले आहेत.
मुंबईत नव्या कोरोनाबाधित रुग्णांची टक्केवारी घटली आहे. मात्र, राज्यातील इतर भागात कोरोना रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्यामुळे कॅबिनेट बैठकीत लॉकडाऊनमध्ये वाढ करण्याबाबतचा निर्णय होईल, असं वडेट्टीवार यांनी सांगितलं.
राज्यात कोरोनाच्या प्रकोपामुळे कडक निर्बंध लावण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्यासाठी राज्यात बुधवार दि. 14 एप्रिल 2021 पासून रात्री 8 वाजेपासून 1 मे 2021 पर्यंत हे कडक निर्बंध लागू राहतील आणि या काळात संपूर्ण संचारबंदी राहील, असे सांगितले असले तरी कोरोना आटोक्यात आला नाही. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन वाढणार असल्याचे बोलले जात आहे.