महाराष्ट्रात लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल; काय सुरु आणि काय बंद जाणून घ्या ?

198
'Weekend lockdown' will be implemented again in Pune

ठाकरे सरकारने राज्यातील लोकांना कोरोनाच्या निर्बंधांपासून मोठा दिलासा दिला आहे आणि अनलॉकबाबत नवीन नियम जारी केले आहेत. (Lockdown restrictions relaxation in Maharashtra)

महाविकास आघाडी सरकारने निर्बंध शिथिल करताना राज्यातील २५ जिल्ह्यांना मोठा दिलासा दिला आहे. सोबतच राज्यातील वीकेंड लॉकडाऊनमध्येही दिलासा दिला आहे.

४ ऑगस्टपासून नवी नियमावली लागू होणार आहे. नव्या नियमावलीनुसार राज्यात सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजेपर्यंत सर्व दुकाने सुरु राहणार आहेत.

मात्र निर्बंधांमधून कोरोना रुग्ण संख्या जास्त असलेल्या ११ जिल्ह्यांना दिलासा देण्यात आलेला नाही. रुग्णसंख्या जास्त असलेल्या ११ जिल्ह्यांमध्ये तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध कायम ठेवले आहेत.

या 11 जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम राहणार आहेत. यामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, बीड, अहमदनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर, सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे.

नव्या नियमावलीनुसार शॉपिंग मॉलसह सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजेपर्यंत, तर शनिवारी दुपारी 3 वाजेपर्यंत सुरु राहतील. रविवारी दुकाने, मॉल बंद राहतील.

सर्व शासकीय आणि खासगी कार्यालये पूर्ण क्षमतेने कार्यरत ठेवता येणार आहेत. मात्र शक्य असेल्यास वर्क फ्रॉम होम सुरु ठेवण्याची देखील सोय आहे.

सर्व कृषी उपक्रम, बांधकामे, औद्योगिक कामे, माल वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरु करता येणार आहे. व्यायामशाळा, योग केंद्रे, हेअर कटिंग सलून, ब्युटी पार्लर, स्पा सुरु 50 टक्के क्षमतेने काम करू शकणार आहेत.

मात्र एसीचा वापर करता येणार नाही. रविवारी ही सेवा बंद राहणार आहे. सर्व चित्रपटगृहे, नाट्यगृहे आणि मल्टिप्लेक्स (स्वतंत्र आणि मॉलच्या आतील) पुढील आदेश येईपर्यंत बंद राहतील.

राज्य शिक्षण विभागाचे आदेश शाळा आणि महाविद्यालयांसाठी लागू राहतील. राज्यातील सर्व मंदिरे, प्रार्थनास्थळे पुढील आदेशापर्यंत बंद राहतील.

पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, नगर, बीड, रायगड, पालघर या ११ जिल्ह्य़ांतील निर्बंध कायम राहणार आहेत.

या जिल्ह्य़ांमध्ये सध्याच्या नियमानुसार दुकाने दुपारी ४ पर्यंतच खुली राहतील. तसेच मॉल्स बंद राहतील. तिसऱ्या स्तराचे निर्बंध या जिल्ह्य़ांमध्ये कायम राहणार आहेत.

त्यांच्यासाठी कोणतीही नवीन सवलती दिलेल्या नाहीत. ११ जिल्ह्य़ांच्या यादीतील सिंधुदुर्ग, सातारा आणि नगर या तीन जिल्ह्य़ांमध्ये दैनंदिन रुग्णसंख्या आणि संसर्गदर जास्त आहे.

त्यामुळे तिथे कडक निर्बंध लागू करण्याचे अधिकार स्थानिक आपत्ती व्यवस्थापनाला देण्यात आले आहेत. दुकानांच्या वेळा वाढविण्यात आल्या असल्या तरी उपाहारगृहांच्या वेळेत बदल करण्यात आलेला नाही.

सध्याच्या प्रचलित वेळेनुसार दुपारी ४ पर्यंत ५० टक्के क्षमतेने उपाहारगृहे सुरू ठेवता येतील. घरपोच सेवेसाठी रात्रीपर्यंत परवानगी देण्यात आली आहे. उपाहारगृहांची वेळ रात्री १० पर्यंत वाढविण्याची संघटनेची मागणी होती.

मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह महानगर क्षेत्रात रेल्वे सेवेचा सर्वसामान्यांना वापर करण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी केली जात होती.

मात्र नव्या आदेशात रेल्वे सेवेबद्दल काहीही उल्लेख करण्यात आलेला नाही. सर्वसामान्यांना लगेचच रेल्वे सेवेचा वापर करण्यास परवानगी दिली जाणार नाही, असे संके त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते.

परवानगी दिल्यास रुग्णसंख्या वाढण्याची भीती तज्ज्ञांच्या कृतिदलाने व्यक्त केली आहे, राज्य सरकारने निर्बंध काही प्रमाणात शिथिल करताच मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी शहरासाठी नवे आदेश जारी केले आहेत.

करोना साथीची दुसरी लाट ओसरू लागल्याने मुंबईतील दुकाने आणि आस्थापना आज, मंगळवारपासून आठवडय़ाचे सर्व दिवस रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

औषधाची दुकाने २४ तास खुली ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. परंतु हॉटेल्स मात्र दुपारी ४ वाजेपर्यंतच सुरू ठेवता येतील. सरकारी आणि खासगी कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरू राहतील.

Also Read 

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here