अर्ध्या वयाच्या मुलाशी ‘प्रेमसंबंध’ भोवले | प्रेमाच्या बदल्यात ‘तिने’ जाळून घेतले

215
CRIME news

अनैतिक संबंध कितीही हवेहवेसे वाटले तरी त्याची दुष्परिणाम भोगावेच लागतात. 

एकमेकांचा कितीही जीव जडलेला असला तरी अनैतिक नाते बंधन किंवा ओझे वाटू लागते, मग एकजण त्यातून सुटण्याचा प्रयत्न करू लागतो.

जेव्हा सुटका होऊ शकत नाही असे वाटू लागते, आणि जोडीदाराला आपले प्रेम जीवापाड असल्याचे सिद्ध करण्याची गरज निर्माण होते तेव्हा एकाचा जीव हमखास जातो, हाच अनैतिक संबंधाचा शेवट असतो.

राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरात गुन्हेगारी घटनांचे सत्र सुरूच आहे. शहरातील सदर पोलीस स्टेशन हद्दीत एका विवाहित महिलेनं प्रेम प्रकरण लपवण्यासाठी पेटवून घेण्याची धक्कादायक घटना घडली आहे.

या प्रकरणी तिच्या प्रियकराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील महेंद्रनगर भागात शुक्रवारी संध्याकाळी ही घटना घडली.

शबाना अब्दुल जावेद (वय 40 ) असं या महिलेचं नाव आहे. शबानाही विवाहित होती मात्र तिचे एका मुलाशी प्रेमसंबंध असल्याची माहिती समोर आली आहे.

प्रेमसंबंध लपवण्यातून ही घटना घडल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. विवाहित महिलेने स्वतःचे प्रेम प्रकरण लपवण्यासाठी पेट्रोल टाकून पेटवण्यात आल्याचे मृत्यूपूर्वी महिलेनं जबाबात म्हटलं आहे.पण नक्की घडले काय हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

शबानाचे अर्ध्या वयाच्या युवकाशी प्रेम संबंध होते. तिने या तरुणाकडे लग्नासाठी तगादा लावला होता. पण, या तरुणाने तिला लग्नास नकार दिला होता. शुक्रवारी दोघांमध्ये याच कारणावरून वाद झाला होता.

त्यानंतर शबानाने पेटवून घेतल्याचे बोलले जात आहे. नागरिकांनी तातडीने या शबानाला रुग्णालयात दाखल केले होते. पण गंभीर भाजल्यामुळे तिचा मृत्यू झाला.

या घटनेत महिलेनं स्वत: पेटवून घेतले की जाळले, हे मात्र अजून तपासातून अद्याप पुढे आले नाही, पोलीस तपास करत आहे.

घटना सदर येथील अंजुमन पॉलिटेक्निक कॉलेज जवळील हल्दिरामसमोर शुक्रवारी (दि.25) सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली होती. भर चौकात घडलेल्या घटनेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली होती.

शबाना ही अजनीतील टाटा मोटर्स येथे काम करीत होती. शुक्रवारी सायंकाळी कार्यालयातून मोपेडवरून घरी जात असताना हल्दिरामसमोर एका तरुणीसोबत तरुण वाद घालत असल्याचे तिने पाहिले आणि इथून वादाला सुरुवात झाली.

तरुणाला समजावून सांगत असताना संतापलेल्या तरुणाने सोबत आणलेले पेट्रोल शबाना यांच्या अंगावर ओतले असल्याचे देखील काही जणांचे म्हणणे आहे.

शबाना यांच्या अंगावरील कपड्याने पेट घेतल्यानंतर तरुण तरुणीला घेऊन घटनास्थळावरुन दुचाकीवरून पसार झाला. शबाना यांना जळताना बघून नागरिकांनी त्या ठिकाणी धाव घेतली, पाणी टाकून आग विझवली.

त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. शबाना हिचा शनिवारी सकाळी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला सदर पोलिसांनी सध्या अकस्मिक मृत्यूची नोंद करून तरुण तरुणाचा शोध सुरु केला आहे.

दरम्यान, पोलिसांनी शबानाच्या प्रियकराला ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सदर पोलीस करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here