अहमदनगर : पुण्यातील प्रियकराच्या त्रासाला कंटाळून नगर शहरातील एका अल्पवयीन मुलीनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
आरोपी प्रियकर मुलीला धर्म परिवर्तनासाठी बळजबरी करत होता, अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. यामुळे मुलीनं राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवलं आहे.
मिळालेली माहिती अशी की, मृत मुलगी ही दीड वर्षापूर्वी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांत पुण्यातील वारजे माळवाडी येथे नातेवाईक यांच्याकडे गेली होती.
तिथे आरोपी सोहेलसोबत मुलीची ओळख झाली. आरोपी शेख याने मुलीला वारंवार फोन करून तिच्याशी प्रेमसंबंध तयार केले. तेव्हापासून शेख व सदर मुलगी एकमेकांच्या संपर्कात होते.
या प्रकरणी तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक केली आहे. सोहेल शेख, (रा. वारजे, माळवाडी पुणे) असं आरोपीचं नाव आहे.
आरोपी सोहेल शेख याच्या त्रासाला कंटाळून मुलीनं 25 नोव्हेंबरला दुपारी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
याप्रकरणी मृत मुलीच्या आईनं फिर्याद दिल्यावरून आरोपी सोहेल शेख याच्याविरोधात आत्महत्या प्रवृत्त केल्याप्रकरणी व पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.