सोशल साईटवरचे प्रेम पडले महागात | प्रेयसीच्या घरच्यांनी बडवले

138

सोशल साईटवर प्रेम आणि त्याचे दुष्परिणाम सगळ्यांना माहित आहेत. त्यातून अनेक गुन्हे घडले व अफलातून प्रकरण घडली आहेत.

लखनौ येथे राहणाऱ्या एका मुलीवर तरुणाचे लॉकडाऊनदरम्यान प्रेम जडले. त्या दोघांची सोशल साईटद्वारे एकमेकांशी ओळख झाली. 

प्रत्यक्षात जेव्हा तो तिला विमानाने भेटायला गेला तेव्हा मात्र तिने त्याला ओळखायला नकार दिला आणि त्यामुळे जे घडले. त्याची त्याने कधी व केव्हा कल्पना केली नव्हती.

त्यामुळे सोशल मिडीयावर झालेल्या ओळखीतून प्रेमात पडताना हजारदा विचार करेन, असा आपण कानाला खडा लावल्याचे तरुणाने सांगितले.

लॉकडाऊनच्या काळात बंगळूरमधल्या एका मुलाची लखनौमधल्या एका मुलीशी ओळख झाली. दोघेही तासनतास एकमेकांशी सोशल साईटद्वारे गप्पा मारायचे.
प्रेयसीच्या वाढदिवसानिमित्त तिला भेटायला जायचे असे या मुलाने ठरवले. त्याप्रमाणे बंगळूर ते लखनौ असे दोन हजार किलोमीटर अंतर विमानाने पार करून तो प्रेयसीला भेटायला गेला.
जाताना वाढदिवसानिमित्त तिला देण्यासाठी भरपूर चॉकलेट्स, टेडीबीयर आणि इतर भेटवस्तू तो सोबत घेऊन गेला. जेव्हा तो प्रेयसीच्या घरी पोहोचला तेव्हा तिने त्याला ओळखायला नकार दिला.
त्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी त्याला घराबाहेर हाकलत त्याची चांगलीच धुलाई केली. त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्याच्या प्रेमप्रकरणाचा खुलासा झाला.
पोलीस अधिकारी सुनील कुमार सिंह यांनी सांगितले की, त्या मुलीच्या कुटुंबीयांनी तरुणाविरुद्ध कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही. त्यामुळे पोलिसांनी त्याची सुटका केली असून एक रात्र त्याला पोलीस ठाण्यात काढावी लागली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here