तिचा ‘व्हिडीओ’ बनवला आणि सोशल मीडियावर अपलोड केला, पोलीसांनी आरोपीला पकडले पण तोपर्यंत ..

485
Girlfriend calls her boyfriend home and launches 'Acid Attack'

सध्या सोशल मीडियावर खाजगी क्षणाचे व्हिडिओ बनवून टाकणाऱ्या विकृत लोकांविरुद्ध तक्रारी वाढल्या आहेत.

आपल्या मैत्रिणीसोबत खाजगी क्षणाचे व्हिडिओ तयार करायचे, फोटो काढायचे आणि कधी तिने विरोध केलाच तर बदनामीच्या नावाने तिला धमकावता यावे याच उद्देशाने अनेकजण कळत नकळतपणे फोटो किंवा व्हिडीओ बनवत असतात.

अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी तरुणाने आपल्या मैत्रिणीचा फेसबुकवर फेक अकाउंट बनवून अर्धनग्न व्हिडिओ व्हायरल केला. हा व्हिडीओ अपलोड करणाऱ्या मजनूला चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केली.

संमुखसिंग हनुमानसिंग बुंदेल (२५) रा. शिवाजी वार्ड असे आरोपीचे नाव आहे. आरोपी संमुखसिंगची मुलीसोबत दोन वर्षांपासून ओळखी होती.

तो नेहमी तिला माझ्याशी दगा दिला तर तुझी बदनामी करतो, तुला आयुष्यातुन उठवतो म्हणून धमकावत होता. अनेकदा मुलीला जातीवाचक शिवीगाळ करायचा. परंतु मुलीने या गोष्टी घरच्यांना कधी सांगितल्या नाहीत.

याच दरम्यान २७ मे रोजी तो तिला महाकाली मंदिरात घेऊन गेला व तिथून येताना जंगलात घेऊन गेला व तिला धमकावले, मारहाण केली. या घटनेनंतर परत त्याने मुलीला १ जूनला जुनोना जंगलात नेऊन तिचे कपडे फाडले व अर्धनग्न स्थितीत व्हिडीओ बनवला.

सदरची पीडित तरुणी त्याला प्रतिकार करीत असताना त्याने तिला धमकावले. तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी देखील दिली. तेव्हापासून तरूणी भीतीच्या सावटाखाली वावरत होती.

त्यानंतर त्या विकृत तरुणाने ४ जूनला आशिष मल्होत्रा नावाचा फेक फेसबुक अकाउंट तयार करून तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला. जो १३४ लोकांनी बघितला.

त्या मुलीनेही तो व्हिडीओ बघितल्यावर ती हादरूनच गेली. तिने आपल्या घरच्यांना पूर्ण प्रकारणाची माहिती दिली. तातडीने बल्लारपूर पोलीस ठाण्यात तक्रार केली.पोलिसांनी व्हिडीओ बघून पंचनामा केला व फेक फेसबुक अकाउंट बंद केला.

आरोपीविरुध्द भादंवि ३७६, ५०६, ३५४, अ.जा.ज.कलम ३ आणि अनुसूचित जाती जमाती प्रतिबंध अधिनियम या व्यतिरिक्त ६६ अ आयटी ॲक्ट या कलमाद्वारे गुन्हा दाखल केला आहे.

त्याला पोलिसांनी शनिवारी चंद्रपूर न्यायालयात हजर केले असता, त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. तरुणींनी कोणाच्या जाळ्यात अडकू नये.

जर चुकून काही वेळा असे घडले तर गप्प न बसता जवळच्या पोलिस ठाण्यात संपर्क साधून माहिती देऊन प्रतिबंध करावा. मुली व महिलांनी स्वतःवर होणारे अत्याचार सहन न करता पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here