बलात्कार करण्यात आला म्हणून, तक्रार करणारी तक्रारदार मुलगी बेपत्ता आहे?
जर असं असेल तर, या गोष्टीत मला तरी आता काही नवीन वाटतं नाही.
कारण
▪️बलात्काराचा आरोपी पत्रकार परिषद घेतो.
▪️ औरंगाबाद पोलीस आयुक्तांना भेटण्यासाठी जातो.
▪️आयुक्तांच्या ऑफिसमध्ये पायावर पाय टाकून रूबाबात बसतो.
▪️बलात्काराचा आरोपी हा निर्दोष हे सांगण्यासाठी सरकारमधील मंत्र्यात चढाओढ लागलेली आहे.
▪️बलात्काराचे आरोप असलेला व्यक्ती मेहबूब शेख राष्ट्रवादी काँग्रेस चा युवक प्रदेशाध्यक्ष आहे.
▪️सत्ता यांची, अधिकार यांचे न्याय पण यांचा, म्हणून मुलगी बेपत्ता झाली तर बिघडलं कुठं ?
आदरणीय गृहमंत्री अनिल देशमुखजी, एक वेळ मान्य करूया की, मेहबूब शेख वरील आरोप सूड बुद्धीने केलेले असतील.
मग, ते आरोप खोटे असतील तर त्याची चौकशी करा. पण बलात्काराचा गुन्हा दाखल होऊन आठवडा झाला, त्याला अटक तर सोडा, साधी चौकशी देखील करत नाहीत.
ज्यापद्धतीने सरकारकडून बलात्काराचे आरोप असलेल्या व्यक्तीला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत आहे.
यातून गुन्हेगारांचे मनोधैर्य वाढत आहे, आणि राज्यात वारंवार बलात्काराच्या घटना घडत आहेत.
देशमुख सर, बलात्कार पेक्षा सोशल मीडियावर सरकार विरोधात लिहणे.
हा सर्वात मोठा गुन्हा झाला आहे का?बलात्काराच्या आरोपीला एवढी मुभा का, कशासाठी.?
देशमुख सर, हीच ट्रीटमेंट सर्वसामान्य गुन्हेगाराला मिळणार का?
तो निर्दोष आहे सिद्ध करण्यासाठी पायावर पाय टाकून बसण्याची, पत्रकार परिषद घेण्याची.?
देशमुखजी, भाजप कार्यकर्त्यांना सरकारविरोधात लिहल म्हणूनझ अटक होते.
पोलीस कोठडी मिळते, पण बलात्काराचे आरोप असलेल्या व्यक्तीला सर्व काही माफ असतं?
– प्रकाश गाडे