महाराष्ट्र भाजपा नेते दिल्लीत दाखल : देवेंद्र फडणवीस गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार

562

राज्यातील प्रमुख भाजप नेते गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत ठाण मांडून बसले आहेत.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील शनिवारपासून दिल्लीत असून त्यांचाही भेटीगाठीवर भर आहे.

दुसरीकडे, दिल्लीत खासदार रावसाहेब दानवे यांच्या निवासस्थानी भाजप नेत्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

या बैठकीत मराठा आरक्षण आणि इतर राजकीय मुद्यांवर चर्चा होणे अपेक्षित आहे.

या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल झाले आहेत.

दरम्यान, ते आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत. दरम्यान, या बैठकीकडे सर्व राजकीय तज्ज्ञांचे लक्ष लागले आहे.

प्रदेशाध्यक्ष बदलाबद्दल पाटील काय म्हणाले

सध्या प्रदेशाध्यक्ष बदलाचा कोणताही विचार नाही आणि आमच्या पक्षात अशी कोणतीही चर्चा नाही.

दर तीन वर्षांनी आमच्या पक्षात मोठे बदल होत असतात. यामध्ये तळागाळापासून राष्ट्रीय अध्यक्षांपर्यंतच्या बदलांचा समावेश आहे.

भाजप हा सामान्य माणसाचा पक्ष आहे आणि यात प्रत्येकाला संधी दिली जाते.

त्यामुळे मी माझा तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेन असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला होता.

प्रदेशाध्यक्ष बदलणार नाही : देवेंद्र फडणवीस

भाजपचे प्रदेशाध्यक्ष बदलण्याची चर्चा माध्यमांमध्ये सुरू झाली आहे.

मात्र, भाजप प्रदेशाध्यक्षांचा कार्यकाळ तीन वर्षांचा आहे आणि चंद्रकांत पाटील यांचा कार्यकाळ पुढील वर्षी जुलैपर्यंत आहे.

त्यामुळे राज्याचे प्रदेशाध्यक्ष बदलाची शक्यता नाही. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही पुण्यात शनिवारी प्रदेशाध्यक्ष बदलणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here