नाना पटोले यांची महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे.
नाना पटोले यांनी कालच (दि.4 फेब्रुवारी) विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.
त्यानंतर आज काँग्रेसने पत्रक काढून नाना पटोले यांची महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याची माहिती दिली. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह सहा कार्यकारी अध्यक्षांची नेमणूक करण्यात आली आहे.
सहा कार्यकारी अध्यक्ष
शिवाजीराव मोघे, बसवराज पाटील, मोहम्मद आरीफ नसीम खान, कुणाल रोहिदास पाटील, चंद्रकांत हांडोरे आणि प्रणिती सुशीलकुमार शिंदे यांची कार्यकारी अध्यक्षपदी निवड झाली आहे.
दहा उपाध्यक्ष
शिरीष मधुकरराव चौधरी, रमेश आनंदराव बागवे, हुसेन दलवाई, मोहन जोशी, रणजीत प्रताप कांबळे, कैलास कृष्णराव गोरंट्याल, बी आय नगराळे, शरद आहेर, एम एम शेख, माणिक मोतीराम जगताप यांची उपाध्यक्षपदी नेमणूक झाली आहे.